Breaking News

मोमीन युसरा फातेमा ज़फ़र अहेमद दहावी बोर्ड परिक्षेत ९३.०० टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार

मोमीन युसरा फातेमा ज़फ़र अहेमद दहावी बोर्ड परिक्षेत ९३.०० टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम      

नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार

बीड।एस.एम.न्युज़
शहरातील नामांकित सर सय्यद अहमद शाळेची विद्यार्थिनी मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद हिने नुकतेच निकाल जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परिक्षेत ९३.०० टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. या निमित्ताने तिचे व पालकांचे नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते आलो पुष्पगुच्छ देऊन शाळेत सत्कार करण्यात आले.
सर सय्यद अहेमद खान सेमी-इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी मोमीन युसरा जफर अहेमद ही अभ्यासात सुरुवातीपासूनच खूप मेहनती व हुशार आहे. शाळेत दिले जाणारे शिक्षण आणि आई-वडिलांचे विशेष लक्ष व मार्गदर्शन यामुळे तिने दहावीच्या परिक्षेत ९३% गुण मिळवत शाळेत मुलींमध्ये (प्रथम क्रमांक) पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य, शिस्तब्ध्द तयारी आणि जिद्दीच्चा जोरावर तिने हे यश मिळवत शाळा व कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे. तिने मिळविलेल्या घवघवीत यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरभरून हृदयी शुभेच्छा दिल्या जात आहे. याप्रसंगी बोलताना तिने सांगितले की, या पुढील शिक्षणही आपण चांगल्या प्रकारे घेऊन जीवनात एक यशस्वी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर होऊन स्वतःसह आई-वडील, शिक्षक वृंद आणि शाळेचे नाव निश्चितपणे उज्वल करणार आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत