जिल्ह्यातील बुवा, बाबा, मांत्रिक यांची माहिती द्या - डॉ. सविता शेटे
बीड(एस.एम.न्युज़) - शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याच महाराष्ट्रात अध्यात्म, देव, धर्माच्या आडून भविष्य, फल ज्योतिष, ग्रहांची पीडा, अज्ञाताची भीती, पूजा, मंत्र, तंत्र, करणी, भानामती अशा मार्गांनी इच्छित फलप्राप्तीचा दावा करून आक्टोपसच्या हजार हाता प्रमाणे बुवाबाजी फोफावत चालली आहे. त्यात सामान्य माणसापासून ते उच्चपदस्थ लोकांसह राजकारणीही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. यातून लोकांची आर्थिक, मानसिक तसेच महिलांचे लैंगिक शोषण केल्याची असंख्य प्रकरणे उघड होत आहेत.
या पार्श्वभूमीवर आपल्या बीड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागात, परिसरात अशा प्रकारचे छोटे मोठे भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक, अम्मा असतील तर त्यांचे संपूर्ण नाव, वय, बघण्याचे ठिकाण, कोणत्या वारी पाहतो, कोणकोणत्या समस्येवर पाहतो, काय उपचार करतो, मोबदला रोख वा वस्तूरूप काय घेतो, पावती देतो का ? मंदिर असेल तर ते धर्मादाय कडे नोंदणीकृत आहे का ? किती लोक येतात ? अशी माहिती लिखित स्वरूपात सही करून आपल्या मोबाईल नंबरसह प्राचार्य डॉ. सविता शेटे, गुलमोहर, आनंद नगर, कॅनॉल रोड, बीड. पिन - ४३११२२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावी किंवा प्रत्यक्ष आणून द्यावी किंवा ९४२२२४३२३६या नंबर वर व्हॉट्सअप करावी.
माहिती पाठवणाऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर पूर्णपणे गुप्त राहील. समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे करावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा