Breaking News

कोचिंग क्लासेसना सुट्टी देण्यात यावी - डॉ. संजय तांदळे

कोचिंग क्लासेसना सुट्टी देण्यात यावी - डॉ. संजय तांदळे                               

बीड (एस.एम.न्युज़) - राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने ४३ ते ४५.३अंशा वर गेला असून पुढील तीन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. बीड जिल्ह्यात दिनांक १२मे २०२६ रोजी ४३ अंश डिग्री तापमान होते. उष्णतेने जिल्ह्यासह राज्यात जवळपास सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. बीड शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दुपारी क्लासला जाताना उष्णतेचा प्रचंड त्रास होत असून अनेक विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर आल्याचे देखील समजते. तरी बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व कोचींग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटना व पालक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी  बीड जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष चौभारे सर  व बीड शहर कोचिंग क्लासेसचे जिल्हाध्यक्ष राम सर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.  यावर आमच्या संघटनेची मीटिंग घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी डॉक्टर संजय तांदळे यांना दिल्याचे म्हटले आहे.

👇👇👇👇👇

*विशेष सुचना*

बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत