पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान बालपणीच्या मित्रांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान
बालपणीच्या मित्रांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
बीड।एस.एम. न्युज़
शहराच्या अजीजपुरा भागातील रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक मुख़्तारखान गुलज़ारखान पठाण यांना पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे मानाचे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राचे नुकतेच वितरण करण्यात आले. यात २०२५ या वर्षासाठी अहेमदनगर आताचे अहिल्यानगर पोलीस प्रशासनातील बिनतारी संदेश विभागाचे पोलीस निरीक्षक मुख़्तारखान गुलज़ारखान पठाण यांना या बहुमानाने गौरवण्यात आले.
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण हे बीड शहराचे भूमिपुत्र. बीड शहरातच त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होत त्यांनी पोलीस प्रशासनात पोलीस उपनिरीक्षक पदावर दमदार प्रवेश केला आणि आपल्या उत्कृष्ट कर्तव्याने पोलीस निरीक्षक पदावर पोहोचले. सध्या ते अहेमदनगर आताचे अहिल्यानगर येथे कर्तव्यरत आहेत. या पदावर त्यांनी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या अलौकिक कामगिरीची नोंद पोलीस विभागाने घेऊन त्यांना दिनांक १ मे २०२६ शुक्रवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले. आपल्या या मित्राला पोलीस विभागात मिळालेल्या मानसन्मानानंतर त्यांचे बालपणीचे मित्र मज़हर शेख, मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, मीर एजाज़ अली उस्मानी, कलीम शेख, फारुख़ शेख, नज़ीर शेख, शकील शेख, रशीद शेख, जमील शेख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीच्या वाटचालीसाठी भरभरून हृदयी शुभेच्छा दिल्या आहेत.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा