डॉ.गणेश ढवळे यांचे नाव लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. संजय तांदळे यांच्याकडून मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
डॉ.गणेश ढवळे यांचे नाव लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये
डॉ. संजय तांदळे यांच्याकडून मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
बीड।एस.एम.न्युज़
दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या संकल्पनेतून सन २०२१ साली चंपावतीरत्न पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांना देण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते. हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार पालीमकर व मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या वतीने २४ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा चंपावतीरत्न व मातृभूमी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना देखील राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु कार्यक्रमातून काही कारणास्तव त्यांना लिंबागणेशला जावे लागल्याने त्यांचा सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन स्थळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डी.जी.तांदळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, शिवाजी कोण होता? हे पुस्तक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय तांदळे, प्रवीणकुमार पालीमकर, डॉ. लक्ष्मण पवळ, शेख युनूस चऱ्हाटकर, रामनाथ खोड, गणेश मस्के, माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक, रामधन जमाले, शेख मुबीन, बाजीराव ढाकणे, अशोक ढोले, शिवाजी हिंदोळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थिती होते.
डॉ. गणेश ढवळे यांचे नाव लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये!
सन २०१४ सालापासून ते आतापर्यंत दर सोमवारी विविध प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या समर्थकांसह वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी आंदोलन ते करीत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून दर आठ दिवसाला आंदोलन करणारे डॉ. ढवळे यांनी आतापर्यंत हजारो आंदोलने केली असून दिवसेंदिवस त्यांच्या आंदोलनांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या आंदोलनांच्या संख्येची नोंद लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असून अशाप्रकारे हजारोंच्या संख्येने केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे नाव फक्त बीड शहर किंवा जिल्हाच नाही तर संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने आंदोलन करणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा