Breaking News

अहेमदनगर रोडवरील बंद एलईडी दिवे तात्काळ सुरू करा फारुख शेख यांची मागणी अन् इशारा

अहेमदनगर रोडवरील बंद एलईडी दिवे तात्काळ सुरू करा

फारुख शेख यांची मागणी अन् इशारा

बीड।एस.एम.न्युज़
शहरातील बालेपीर भागात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अहेमदनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून नागरिकांनी या नव्या रस्त्याचे स्वागत केले होते. मात्र रस्ता तयार झाल्यानंतर बसविण्यात आलेल्या एलईडी स्ट्रीट लाईट्सबाबत गंभीर निष्काळजीपणा दिसून येत आहे. रस्त्यावर लावण्यात आलेल्या अनेक दिव्यांपैकी काही दिवे सुरू असतात तर काही कायम बंद अवस्थेत आहेत. ही समस्या कधीतरी नव्हे तर रोजच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप आहे.
हा मार्ग शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा असून येथे दिवसभर तसेच रात्रीही लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. रस्ता रुंद असल्यामुळे अनेक वाहने वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत रस्त्यावरील अर्धे दिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण आहे. यामुळे पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
                स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नव्याने उभारलेल्या रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले काय, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
              राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना माफी देऊ नये. अहेमदनगर रोडवरील सर्व बंद दिवे तातडीने सुरू करून संपूर्ण प्रकाश व्यवस्था नियमित ठेवावी. अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
               तसेच या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नव्या रस्त्यावर नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
              नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित पाहणी करून अहेमदनगर रोडवरील सर्व एलईडी दिवे सुरू ठेवावेत, तसेच भविष्यात असा निष्काळजीपणा पुन्हा होणार नाही याची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत असल्याचे फारुख शेख यांनी शेवटी म्हटले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत