खरंच विचार करायला लावणारा विषय व बातमी
खरंच विचार करायला लावणारा विषय व बातमी
बीड (गोरखनाथ चिंचोलीकर) - एप्रिलच्या महिन्यात सूर्य आग ओकु लागला. तापमान ४०अंशाच्या वर चालले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत रस्त्यावरून चालणे धोक्याचे झाले. उन्हाळा असताना देखील घराघरातून सर्दी, खोकला, पडसे याचे रुग्ण दिसून येत आहेत. लोक दवाखान्यात धावत आहेत. परंतु इलाज काही होईना. डॉक्टर विविध प्रकारच्या औषधी देतात पण कायम इलाज होईना. असं का होऊ लागलं आहे? यावर देखील आता ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चा रंगू लागल्या. झोपड्या गेल्या, गाय गोठे गेले, अन् सिमेंटचे जंगल आले. झाडं गेली, थंडगार सावली नाहीशी झाली. याला एकमेव कारण आपणच आपल्या पायावर मारलेली कुऱ्हाड. ज्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि सिमेंटचे जंगल हेच आहे. आज ठीक आहे परंतु जिथं तिथं बनवलेले सिमेंटचे रस्ते आणि उभारलेल्या टोलेजंग इमारती या आपल्या सोयीसाठी नाहीत तर माणसाचे आयुष्यमान घटवण्यास कारणीभूत ठरू नयेत म्हणजे झाले, असे मत आता नागरीकच व्यक्त करू लागले आहेत. ऋतुमानाप्रमाणे असलेला उन्हाळा यावर्षी कठीण जाणवत असल्याचे नागरिकांचे मत येत आहे. सिमेंट काँक्रीटच्या इमारतीमध्ये कुलर लावा, एसी लावा, तात्पुरता थंडावा मिळतो परंतु बाहेर पडताना कडक उन्हामुळे आणि उष्णतेने लाहीलाही होते. यामुळे आजाराला निमंत्रण मिळत आहे. एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. उष्णतामान एवढे वाढले आहे की, दिवसा बाहेर पडणे भीती घेण्यासारखे आहे. यातच लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खोकला, सर्दी अशा सर्वसामान्य आजाराने एवढे ग्रासले आहे की, रुग्णालयात प्रचंड गर्दी होताना दिसून येते. एका दिवशीच्या डोसा मध्ये हा आजार बरा होणारा परंतु पंधरा-पंधरा, वीस-वीस दिवस उपचार करून देखील आजार जाईना. यावर मात्र ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती तज्ञ मंडळींना देखील विचार करावयास लावणारी म्हणावी. विकासाच्या नावाखाली निसर्गाला आपण विसरलो आहोत. झाडे तोडल्यामुळे सावली गेली आहे. उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या झोपड्या गेल्या, धाबे नाहीत, छपराचे गायगोठे देखील नाहीत. अशावेळी सिमेंट काँक्रीटच्या घर व इमारतीमध्ये कुलर आणि एसीची हवा घेऊन उकाड्यावर मात करता येत असेल परंतु बाहेर पडले तर आगीत टाकल्यासारखे होते. त्यामुळे माणसाच्या शरीरावर कधी थंड तर कधी उष्ण आघात होऊन रोगाला निमंत्रण मिळते. यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग नियमाला आपण पाहत नाहीत. पूर्वी फक्त घरबांधणीसाठी सिमेंट वापरले जायचे तर ज्या रस्त्यावर डांबर अंथरले जायचे ते रस्तेही आता सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत व होत आहेत. रस्त्यावरील डांबर उन्हाळ्यात पगळते, तेव्हा फुफुटा धुलीकन चिटकून बसतात. ज्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परंतु सिमेंट रस्त्यावरून वाहने जेव्हा जातात तेव्हा टायरच्या घसारामुळे सिमेंटचे अतिसुक्ष्म कण उडून वातावरणात पसरतात. हे सिमेंटचे कण नाक आणि फुफ्फुसात गेल्याने बहुतेक उन्हाळ्यामध्ये सर्दी, खोकला, पडसे या आजारांना मोठ्या प्रमाणात निमंत्रण मिळत असावे. ज्यामुळे डॉक्टरांनी इलाज करून देखील रग्ण वेळेत बरा होत नाही. याला जर सिमेंटचे रस्ते व त्यामधून उडणारे सूक्ष्म धूलिकन कारणीभूत ठरणारे असतील तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा विकास हा मानवाला परवडणारा नाही. यासंदर्भात विज्ञानवादी दृष्टिकोनातून जरा विचार करावा असे मत देखील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसून आले.
साभार - दैनिक पार्श्वभूमी
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा