बातमी प्रकाशित होताच गॅस एजन्सी कडून घरपोच सिलेंडर वितरित करण्याचे पत्रक; नियम व अटींमुळे ग्राहकांचा त्रास कमी होणार की अजून वाढणार?
नियम व अटींमुळे ग्राहकांचा त्रास कमी होणार की अजून वाढणार?
बीड (एस.एम.न्युज़) - एलपीजी गॅस ग्राहकांची सिलेंडर साठी होत असलेली अडवणूक पाहून, 'ग्राहकांना गॅस मिळाल्याचे फक्त ऑनलाईन मेसेज, प्रत्यक्षात सिलेंडर ऑफ लाईन गायब' या मथळ्याखाली प्रसिद्धी माध्यमातून बातमी प्रकाशित होताच, गॅस एजन्सी वाल्याकडून दुसऱ्याच दिवशी 'आता गॅस सिलेंडर घरपोच वितरित करण्यात येतील' अशा आशयाचे पत्रक काढण्यात आले. मात्र या सेवेसाठी दिलेल्या नियम व अटींमुळे ग्राहकांचा त्रास कमी होणार की अजून वाढणार? असा प्रश्न या मुद्याकडे लक्ष वेधणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, गॅस टंचाईमुळे एलपीजी वितरकाकडून प्रथम गॅस ग्राहकांना ऑनलाईन सिलेंडर बुकिंग साठी सांगण्यात येत होते. बुकिंग झाल्यावर ऑनलाईन पैसे घेतले जात होते. त्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळाले म्हणून मेसेज टाकण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र अनेक ग्राहकांना असे मेसेज येऊनही सिलेंडर मिळत नव्हते. ज्याचा त्रास गॅस ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत होता म्हणून याविषयी दिनांक ७ एप्रिल रोजी प्रसिद्धी माध्यमातून बातमी देण्यात आली होती. याची दखल घेऊन गॅस एजन्सी च्या वितरकाने दिनांक ८ एप्रिल रोजी आता यापुढे गॅस ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळेल. अशा आशयाचे पत्रक प्रसिद्धी माध्यमाला दिले. मात्र त्यासाठी पुन्हा काही नियम व अटी सुद्धा अधोरेखित केल्याने घरपोच सिलेंडर देण्याची सेवा सुरू केल्यावर गॅस ग्राहकांचा त्रास कमी होणार की अजून वाढणार? असा प्रश्न या मुद्द्याकडे लक्ष वेधणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा