Breaking News

सन २००० ते २०२५ पर्यंतच्या सर्व सदोष मतदार याद्यांची होळी करा धरणे आंदोलनात एस.एम.युसूफ़ यांनी सादर केली नऊ मुद्यांची यादी

सन २००० ते २०२५ पर्यंतच्या सर्व सदोष मतदार याद्यांची होळी करा

धरणे आंदोलनात एस.एम.युसूफ़ यांनी सादर केली नऊ मुद्यांची यादी

बीड।एस.एम.न्युज़
सध्या महाराष्ट्रात एस.आय.आर. प्रक्रिया पार पाडण्यात येऊ लागली आहे. मात्र अगोदर सदोष मतदार याद्या दोषमुक्त करून नंतर एस.आय.आर प्रक्रिया राबवा अशी मागणी आंदोलनकर्ते एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या निवेदनातून याकरिता नऊ मुद्यांची यादी जबाबदार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातून सादर केली आहे.
दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करताना देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून नऊ मुद्दे मांडले असून सध्या एस.आय.आर. प्रक्रियेत तयार करण्यात येत असलेल्या मतदार याद्या सुद्धा सदोषच तयार होते आहे असे म्हटले आहे.
                  याशिवाय असेही म्हटले आहे की, एस.आय.आर. प्रक्रिया राबवितांना निवेदनात उल्लेख केलेल्या नऊ मुद्द्यांवर शासकीय-प्रशासकीय पातळ्यांवर कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच एस.आय.आर. प्रक्रिया केल्याचे सार्थक होईल अन्यथा शासकीय-प्रशासकीय स्तरासह सर्वसामान्य भारतीय मतदारांवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. जर भारतात भारतीय नागरिक असलेल्या मतदारांची पारदर्शकतेने मतदार याद्यांमध्ये नोंद घ्यायचीच असेल तर निवेदनात उल्लेख केलेल्या निवेदनात मांडलेल्या नऊ मुद्द्यांवर सर्व जबाबदार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून कार्य होणे अपेक्षित आहे असे एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.

आंदोलनात मांडलेले मुद्दे -

१) दोषयुक्त मतदार याद्या घेऊन एस.आय.आर. करू नका. २) दोषमुक्त नवीन मतदार याद्या तयार करून नंतर एस.आय.आर. करा. ३) सन २००० ते २०२५ पर्यंतच्या सर्व सदोष मतदार याद्यांची होळी करा. ४) संपूर्ण भारतात घरोघरी फिरून मतदारांची बिनचूक नावे, पत्ते आणि वयाची नोंद करा. ५) संपूर्ण भारतात एकही मृत मतदाराचे नाव मतदार यादी मध्ये राहू देऊ नका. ६) एकाच मतदाराची असलेली दुबार नावे मतदार यादीतून कपात करा. ७) भारतीय महिला असो की पुरुष ते सध्या जिथे वास्तव्यास आहेत, तिथेच त्यांच्या नावांची नोंद घेऊन मतदार यादीसाठी मॅपिंग करा. ८) एकाही भारतीय मतदाराला त्याचे नाव मतदार यादी मध्ये येण्यापासून वंचित ठेवू नका. ९) दिनांक ८ मार्च २०२६ पासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेतून तयार करण्यात येणाऱ्या मतदार याद्या गृहीत धरू नका.

===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत