सेक्सच्या हव्यासापोटी स्वतःच्या आयुष्यासह आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा करू नका डॉक्टराच्या आत्महत्येला घटस्फोटीत महिलेशी असलेले अनैतिक सेक्स संबंध कारणीभूत
डॉक्टराच्या आत्महत्येला घटस्फोटीत महिलेशी असलेले अनैतिक सेक्स संबंध कारणीभूत
अंबाजोगाई (एस.एम.न्युज़) - उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असो की विद्यार्थिनी ते तरुण असल्याने साहजिकच त्यांना एकमेकांचे शारीरिक आकर्षण होऊ लागते. असे आकर्षण दुतर्फा असेल तर त्यांच्यात अनैतिक शारीरिक संबंध निर्माण व्हायला वेळ लागत नाही. असे अनैतिक संबंध निर्माण झाल्यास त्याचा परिपाक हा पश्चातापात झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या भारत देशात भारतीय संस्कृती जपून जगावे लागते. जी खूप चांगली आणि नैतिकतेच्या मजबूत पायावर उभी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आई-बाप आपल्या इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षांना मुरड घालत जीवाचे रान करून त्यांच्या शिक्षणाचा भार उचलतात. याचे भान उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सदैव ठेवणे आवश्यक आहे. यात त्यांच्या जीवनाचे हित तर असतेच शिवाय आई-वडिलांच्या कष्टाचे फळ ही ते अपेक्षित ध्येय साध्य करून यशस्वी जीवन जगू शकतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न होणारच असते. त्यानंतर त्यांना पती-पत्नी म्हणून एक दुसऱ्या सोबत शारीरिक गरज पूर्ण करता येतेच. परंतु काही जण लग्नाअगोदरच नको ते उद्योग करून स्वतःच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ तर करतातच शिवाय आई-वडिलांच्या मेहनतीचीही माती करतात. असाच प्रकार नुकताच अंबाजोगाई येथे एका डॉक्टराने आत्महत्या केल्याने समोर आला आहे.
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला डॉ. मंदार उमेश दाभाडे (वय २९) या तरूणाने अंबाजोगाईतील चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथील भाड्याच्या खोलीत ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.
सुरुवातीला या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते, मात्र आत्महत्येपूर्वी मंदार याने त्यांच्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या स्वतःच्या मोबाईलच्या पासवर्डमुळे या प्रकरणातील वास्तव समोर आले असून एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मृत डॉक्टरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा उलगडा अतिशय नाट्यमयरीत्या झाला असून मंदार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांचे भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरून मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली.
त्यात मंदार यांनी 'सॉरी पप्पा व भैया' असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली असून स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत (मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रोहिदास नगर, चनई रोड, अंबाजोगाई) डॉ. मंदार यांची ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने 'मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहीन,' अशी धमकी देत त्याला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेला. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले. या धक्कादायक खुलास्यानंतर लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी १० एप्रिल रोजी रात्री आरोपी महिले विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ससाणे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा