Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेला आठवली अवदसा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेला आठवली अवदसा

राजुरी वेस-बलभीम चौक, जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर खडीचा मारा; दुचाकी स्वार धडाधड पडू लागले!

बीड।एस.एम.न्युज़ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेला अवदसा आठवल्याने शहरातील राजुरी वेस-बलभीम चौक, जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर खडीचा मारा करण्यात आला आहे. या खडीमुळे दुचाकी स्वार धडाधड पडू लागले आहेत. त्यातही महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महामानवाच्या जयंती निमित्ताने जर रस्ता चांगला करायचाच होता तर निव्वळ खडी ऐवजी डांबर मिश्रित खडी आणि कच टाकून तरी खड्डे बुजवायचे होते. अशी प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होऊ लागल्या आहेत.
                   दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण बीड शहरावरून ओवाळून फेकलेल्या राजुरी वेस ते बलभीम चौक आणि भाजी मंडई चौक ते जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर बीड नगरपरिषदेने रात्रीतून खडी चा मारा केला आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे दुचाकी स्वार धडाधड पडू लागले आहेत. पडणाऱ्यांमध्ये महिला आणि तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे पाहता बीड नगरपालिका जनतेला त्रास देण्याकरिता कधी कोणते पाऊल उचलेल याचा नेम नसतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. नगरपालिकेच्या या खडी उधळून त्रास देण्याच्या कार्यामुळे भीम जनतेसह संपूर्ण बीड शहरवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे. तसेच महामानवाच्या जयंती निमित्ताने जर रस्ता चांगला करायचाच होता तर निव्वळ खडी ऐवजी डांबर मिश्रित खडी आणि कच टाकून तरी खड्डे बुजवायचे होते. अशी प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होऊ लागल्या आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत