दैनिक लोकनायक चा अकरावा वर्धापन दिन थाटात साजरा संपादक, व्यवस्थापकांवर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दैनिक लोकनायक चा अकरावा वर्धापन दिन थाटात साजरा
संपादक, व्यवस्थापकांवर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बीड।एस.एम.न्युज़
येथील दैनिक लोकनायक चा अकरावा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी संपादक भारत भाऊ गायकवाड आणि व्यवस्थापक विश्वंभरराव मुळे यांच्यावर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीड शहरातील सुभाष रोड वर स्थित असलेल्या दैनिक लोकनायक कार्यालयात वृत्तपत्राचा अकरावा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला. संपादक भारत भाऊ गायकवाड आणि व्यवस्थापक विश्वंभरराव मुळे यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी होती. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, उच्च पदस्थ अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, विविध वृत्तपत्रांचे संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक, पत्रकार, छायाचित्रकार, संगणक तज्ञ, छपाई मशीन तज्ञ अशा सर्वांनी मिळून शुभेच्छा देऊन यापुढेही दैनिक लोकनायक ने अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती करावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनीही आपल्या या दोन्ही हितचिंतक मार्गदर्शकांना भेटून हृदयी शुभेच्छा दिल्या.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्यालय पूर्णपणे सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा