Breaking News

मुख्याधिकारी, अभियंता यांना दंडीत करून निलंबित करा; गुत्तेदाराचा परवाना रद्द करा


मुख्याधिकारी, अभियंता यांना दंडीत करून निलंबित करा; गुत्तेदाराचा परवाना रद्द करा

बीड।एस.एम.न्युज़
भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमित्त करून बीड शहरातील राजुरी वेस ते बलभीम चौक आणि नवी भाजी मंडई ते चौक ते जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर खडी टाकून लोकांना त्रास देऊन जनतेच्या पैशांची वायफळ उधळपट्टी केल्याबद्दल बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि अभियंता यांना दंडीत करून निलंबित करण्यात यावे तसेच गुत्तेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.
                 याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरातील काही रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बकाल झाली आहे. तरीही राजकारणी पदाधिकारी असो की प्रशासनिक अधिकारी किंवा बीड नगरपरिषद असो, ओवाळून फेकलेल्या या रस्त्यांविषयी कुणालाही काडीचेही गांभीर्य नाही. तर जनतेची अवस्था ही गुराढोरांसारखी झाली आहे, 'मुकी बिचारी कुणीही हाका.' अशा अवस्थेत दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न महामानव भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बीड नगर परिषदे कडून रस्त्यांवर नुसती खडी टाकून देण्यात आली. ज्यामुळे कमी उंचीची असलेली दुचाकी वाहने चालविणारे महिला-पुरुष मोठ्या संख्येने रस्त्यांवर पडले. अनेकांना दुखापत झाली. ही बाब लक्षात घेऊन प्रसिद्धी माध्यमातून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेला आठवली अवदसा' या शीर्षकाने बातमी दिली असता झोपलेली बीड नगर परिषदेची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी या चुकीच्या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यांवर टाकलेली खडी उचलून नेली. त्यानंतर या रस्त्यांवर चिखल होवूस्तर पाण्याचा मारा केला. बीड नगर परिषदेच्या अशा भोंगळ कारभारामुळे जयंतीदिनी नागरिकांना मोठा मनस्ताप तर झालाच शिवाय दुखापती झाल्या तसेच खडी आणून टाकणे नंतर ती पुन्हा उचलून नेने आणि त्यानंतर पाणी मारून रस्ते ओलेचिंब करणे या सर्व प्रक्रियेमध्ये जी काही लाखो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे ती चुकीच्या धोरणामुळे. म्हणून असे उपटसुंभ कार्य करणारे बीड नगर परिषदेचे बेजबाबदार मुख्याधिकारी, अभियंता यांनी केलेली ही लाखो रुपयांची उधळपट्टी त्यांच्याकडून दंडासहित वसूल करण्यात यावी तसेच ही प्रक्रिया राबविणाऱ्या गुत्तेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा. अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.

*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत