Breaking News

'कैसा हराया' फेम सहर शेखचे नगरसेवकपद जाणार


'कैसा हराया' फेम सहर शेखचे नगरसेवकपद जाणार

ठाणे (एस.एम.न्युज़) - महापालिका निवडणूक निकालानंतर केलेल्या विजयी भाषणात कैसा हराया हे फक्त दोनच शब्द खास अंदाजामध्ये व्यासपीठावरून बोलल्यानंतर राज्यात चर्चेत आलेल्या युवा नगरसेविका सहर शेख चे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
              ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे. सहर शेख आणि वडील युनूस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस ही तहसीलदार उमेश पाटील यांनी आपल्या अहवालात केली आहे. उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जातपडताळणी समितीकडे शिफारस केली आहे. सहरच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार सिद्दीकी अहेमद यांनी केली होती. सहर शेख च्या विरोधात सिद्दीकी अहेमद यांनी तक्रार केली होती. त्यावर चौकशी करण्यात आली. त्यात सहर शेख दोषी असल्याचे आढळले आहे. आता सहर शेख चे नगरसेवकपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत