खरे सव्वाशेर वृत्तपत्र आणि युट्युब वाहिनीच्या बीड प्रतिनिधीपदी एस.एम.युसूफ़ संस्थापक मुख्य संपादक लियाकतखान पठाण यांनी केली निवड
बीड।एस.एम.न्युज़
ज्येष्ठ पत्रकार तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांची खरे सव्वाशेर वृत्तपत्रासह youtube वाहिनीच्या बीड प्रतिनिधीपदी संस्थापक मुख्य संपादक लियाकतखान पठाण यांनी निवड केली आहे.
एस.एम.युसूफ़ सन २०१४ सालापासून वृत्तपत्र क्षेत्रात मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या परखड व वस्तुस्थितीदर्शक पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षापासून आजपर्यंत विविध विषयांवर हजारो बातम्या आणि शेकडो लेख लिहिले आहेत. त्यांनी केलेल्या लिखाणास बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांसह विभागीय वृत्तपत्रे तसेच औरंगाबाद, जालना, अहेमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून प्रकाशित होणारे वृत्तपत्र सुद्धा प्रकाशित करतात. एक तपापेक्षा जास्त काळाच्या अनुभवाने त्यांच्या पत्रकारितेला मोठ्या प्रमाणात परिपक्व केले आहे. पत्रकारितेविषयी त्यांच्या तनमनात असलेली तळमळ, समाजातील प्रत्येक घटकाला पडणारे प्रश्न, निर्माण होणाऱ्या समस्या आणि ती तेवढ्याच तन्मयतेने मांडण्याची खुबी पाहून खरे सव्वाशेर वृत्तपत्र आणि युट्युब वाहिनीचे संस्थापक मुख्य संपादक लियाकत खान पठाण यांनी एस.एम.युसूफ़ यांची बीड प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा