Breaking News

पारवेताई; पगारे,माने, देशमुख यांना नोटीस; मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना बगल का?

पारवेताई; पगारे,माने, देशमुख यांना नोटीस; मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना बगल का?

बीड।एस.एम.न्युज़ - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेने शहरात हैदोस घातल्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून याची मोठ्या प्रमाणात चिरफाड करण्यात आली, त्यानंतर नगराध्यक्ष प्रेमलता पारवे ताई यांनी बैठक घेऊन नगरपरिषदेतील पगारे, माने आणि देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचेही म्हटले. मात्र मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना का बगल देण्यात आली? असा प्रश्न यानिमित्ताने एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
               याविषयी सविस्तर वृत्त असे की, त्यांच्या या पावलामुळे तत्कालीन कायमस्वरूपी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी निलावाड या तत्कालीन जोडीची आठवण आली. ही जोडी ही एक दुसऱ्यांना अशी काही सांभाळून घेत होती की, एक दुसऱ्याला सांभाळून घेण्याच्या नादात त्यांनी बीड शहराची पूर्णतः वाट लावून टाकली होती. याचेच फळ म्हणून आज बीड शहराची जी काही दुर्दशा आहे त्यात या जोडीचा खूप मोठा हात आहे.
         बीड नगर परिषदेत पारवे ताई यांच्या रूपात प्रथमच एक भीम कन्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्याचा अभिमान बीड शहरवासियांना निश्चितपणे झालेला आहे. परंतु दुर्दैव आहे की, याच भीम कन्येच्या कार्यकाळात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्याच जयंतीला रस्त्यांवर खडी टाकून, पुन्हा ती उचलून, रस्त्यांवर चिखल होईपर्यंत पाणी मारून बीड नगर परिषदेने असे काही गालबोट लावले की सगळीकडे थू-थू व्हायला लागली आहे. निदान याचे भान ठेवून तरी कारवाई व्हायला हवी.
              पगारे, माने, देशमुख या तिकडीसह मुख्याधिकारी म्हणून शैलेश फडसे यांचे उत्तरदायित्व या तिघांपेक्षा कितीतरी मोठे आहे आणि त्यांनी आपल्या याच उत्तरदायित्वात कसूर केल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी.
                जसे कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कमी पडले तर या सर्वांचे खापर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या डोक्यावर फोडले जाते, तसे बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अधिकारी, अभियंते किंवा कर्मचारी कोणीही असो त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यावर मुख्याधिकारी यांचाही त्यात वाटा असतो. हे विसरता कामा नये.
              वरिष्ठ अधिकारी जेव्हा कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवू शकत नाही, तेव्हाच कार्य व्यवस्थित होत नाही. हे लक्षात घेऊन मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनाही कारणे दाखवा नोटीस द्यायलाच हवी. मात्र त्यांना नोटीसीतून का बगल देण्यात आली? असा प्रश्न यानिमित्ताने एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत