ग्राहकांना गॅस मिळाल्याचे फक्त ऑनलाइन मेसेज; प्रत्यक्षात सिलेंडर ऑफ लाईन गायब!
ग्राहकांना गॅस मिळाल्याचे फक्त ऑनलाइन मेसेज; प्रत्यक्षात सिलेंडर ऑफ लाईन गायब!
बीड (एस.एम.न्युज़) - पेट्रोल-डिझेल नंतर आता स्वयंपाकाच्या गॅस साठी ही ग्राहकांना मोठ्या त्रासास तोंड द्यावे लागत असल्याचा प्रकार बीड शहरातील गॅस वितरण करणाऱ्या वितरकांच्या कार्यालयात दिसून येऊ लागला आहे. ग्राहकांना गॅस मिळाल्याचे ऑनलाइन मेसेज येऊ लागले पण प्रत्यक्षात मात्र सिलेंडर ऑफ लाईन गायब होऊ लागले आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहाराच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, सध्या इराण-अमेरिका या दोन देशांमध्ये भयंकर युद्ध सुरू असल्याचा परिणाम आपल्या भारत देशात सुद्धा दिसू लागला आहे. याचाच परिपाक म्हणून पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा तर दिसत आहेत. शिवाय स्वयंपाक घर गॅस विना राहू नये म्हणून गॅस वितरक एजन्सी वर सुद्धा गॅस ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येऊ लागल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी लांबच लांब रांगा लागत असल्याने इंधन मिळविण्याकरिता कधी धक्काबुक्की तर कधी बाचाबाची सुद्धा होऊ लागली आहे. हे कमी होते की काय म्हणून गॅस वितरकाकडे गॅस पाहिजे म्हणून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्रथम तुमची नोंदणी पूर्ण झाली असल्याचा मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येऊ लागला असून त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या गॅस सिलेंडरची डिलिव्हरी पूर्ण होऊन तुम्हाला सिलेंडर देण्यात आले. असे मेसेजही ग्राहकांच्या मोबाईलवर धडकू लागले आहेत.
गॅस सिलेंडर मिळविण्याकरिता अगोदरच नाकी नऊ येत असल्याने त्रासलेल्या ग्राहकांना या मेसेजने पुरते हैराण करून सोडले आहे. हा मेसेज आल्यानंतर जेव्हा संबंधित ग्राहक गॅस वितरकाकडे जाऊन मला तर गॅस सिलेंडर मिळाला नाही आणि मेसेज कसा आला? असा प्रश्न केला असता सुरुवातीला तर उडवाउडवीची उत्तरे देऊन गॅस ग्राहकांची बोळवण करण्यात येऊ लागली आहे तर काही कणखर व खमके गॅस ग्राहक यानंतर गॅस वितरण करत असलेल्या व्यवस्थापकासोबत किंवा एजन्सी मालकासोबत वस्तुस्थिती दाखवून आपला इंगा दाखवू लागले तेव्हा त्यांना गॅस वितरकाकडून निमुटपणे सिलेंडर देण्यात येऊ लागले आहेत. परंतु ज्या गॅस ग्राहकांनी सिलेंडर घेतलाच नाही तरीही त्यांना सिलेंडर घेतल्याचे मेसेज आले आणि त्यांनी ते पाहून गप्प बसणे पसंत केले तर प्रश्न हा येतो की, अशा गॅस ग्राहकांचे सिलेंडर मग नेमके कुठे जात आहेत? कारण कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया जोपर्यंत अधिकारीकरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतेही मेसेज समोरच्याला जात नाही. मात्र गॅस वितरणामध्ये गॅस सिलेंडर न घेता ही तुम्ही सिलेंडर घेतले आहे, तुम्हाला सिलेंडर मिळाले आहे, असे जे ऑनलाईन मेसेज गॅस वितरकाकडून टाकण्यात येऊ लागले आहेत.
अशा ग्राहकांचे गॅस सिलेंडर नेमके कुठे जात आहेत? याचा सोक्षमोक्ष कोण लावणार? असे प्रश्न या अनुषंगाने पडू लागले आहेत. या अवस्थेला शहरात राहणारे गॅस ग्राहक कसे तरी तोंड देत आहेत परंतु जे गॅस ग्राहक ग्रामीण भागातून येऊन शहरात असलेल्या गॅस वितरकाकडून गॅस घेऊन जाण्यासाठी येतात त्यांना मात्र तासान तास लाईनीत उभे राहूनही त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यांच्या मोबाईलवर सिलेंडर मिळाले असल्याचे मेसेज आल्याने त्यांना हिरमुसले होऊन आल्या पावली येण्याजाण्याचा खर्च भुर्दंड रुपात सहन करून रित्या सिलेंडरसह परत आपल्या गावी जावे लागत आहे. यात शहरी भागासह ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांची होणारी ससेहोलपट कोण रोखणार? कोण याकडे लक्ष देणार? असे प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होऊ लागल्याचे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा