Breaking News

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने काढले पत्र मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदारांना गांभीर्य नाही किंवा ते झोपेतच

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने काढले पत्र

मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदारांना गांभीर्य नाही किंवा ते झोपेतच

बीड।एस.एम.न्युज़
एसआयआर प्रक्रिया राबवितांना मतदार याद्यांमध्ये असलेल्या असंख्य त्रुटी शासनासह प्रशासनाला दिलेल्या तीन निवेदनांमधून सविस्तरपणे मांडल्यानंतर या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्र काढले मात्र मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बीड यांनी त्यावर कोणती कारवाई केली? याविषयी आठवडा उलटूनही उत्तर न दिल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे किंवा ते झोपेत असल्याचे सडेतोड मत याविषयी पाठपुरावा करणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मांडले आहे.
                   याविषयी सविस्तर वृत्त असे की, मतदार याद्या दुरुस्त करण्याकरिता निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेली एसआयआर प्रक्रिया या प्रक्रियेशी संबंधित प्रशासनिक अधिकारीच गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. सन २००० च्या असो की, २००२, २००४ किंवा २०२५ च्या असो, प्रत्येक मतदार याद्यांमध्ये असंख्य मृतांची नावे आहेत. विवाह होऊन जिल्हा बाहेर गेलेल्या महिलांची नावे, मतदारांचे पत्ते आणि वय यात अतोनात अक्षम्य चुका असताना, अशा सदोष मतदार याद्या घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासन एसआयआर प्रक्रिया राबवित असल्याने या सर्व बाबी या अगोदर दिनांक ०६ मार्च २०२६, १७ मार्च २०२६ आणि ३० मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्यासह भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून मांडण्यात आलेल्या आहेत.
                याची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, बीड (निवडणूक विभाग) यांनी दिनांक ३० मार्च २०२६ रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बीड यांच्या नावे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या निवेदनाचा संदर्भ देऊन प्रशासकीय पत्र काढले.
                त्यात याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधीत एस.एम.युसूफ (पत्रकार) बीड यांना आपले स्तरावरुन कळवावे. तसेच या कार्यालयास अवगत करावे, असे आदेशित केले. त्याला एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बीड यांनी मतदार याद्या दुरुस्त करण्याकरिता कोणते कार्य केले किंवा करणार आहेत? मतदार यादी मध्ये एकही मृत मतदाराचे नाव राहणार नाही. सन २००० नंतर विवाहित झालेल्या महिला मतदारांची नावे एसआयआर प्रक्रियेनंतर तयार करण्यात येणाऱ्या नवीन मतदार याद्या मध्ये येण्यापासून वंचित राहणार नाहीत. याकरिता प्रशासनिक अधिकारी म्हणून ते नेमके काय कार्य करतील? याबद्दल अजूनही या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी कळविलेले नाही.
              यामुळे एकीकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्र काढून जागरूकता दाखविली असली तरी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बीड हे मात्र अजूनही झोपेतच असल्याचे किंवा याचे गांभीर्य त्यांना नसल्याचे दिसून येत आहे. असे सडेतोड मत याविषयी सातत्याने पाठपुरावा करणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मांडले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत