जिल्हा रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा सर्व गटाच्या रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या
जिल्हा रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा
सर्व गटाच्या रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या
बीड।एस.एम.न्युज़
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून रक्ताअभावी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून खेड्यापाड्यातून विविध उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने रुग्ण येतात. अशा शस्त्रक्रिया ज्यात रुग्णांना रक्त दिल्याशिवाय गत्यंतर नसते, अशा रुग्णांकरिता वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत जवळपास सर्वच गटातील रक्ताचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्याने रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रक्तपेढ्यांमध्ये पळापळ करावी लागत आहे. यासाठी सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना ऐपत नसूनही रक्तासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहे. पण हवे असलेल्या गटाचे रक्त जर तिथेही नाही भेटले तर अशावेळी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. ही बाब लक्षात घेता सर्व गटातील प्रत्येक रक्तदात्यांनी पुढे येऊन जिल्हा रुग्णालयात रक्तदान करावे. जेणेकरून रक्त हवे असलेल्या रुग्णांच्या जीवावर बेतू नये. असे कळकळीचे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी केले आहे.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा