Breaking News

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या स्मृति प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आयोजकांचे आवाहन

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या स्मृति प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आयोजकांचे आवाहन

बीड।एस.एम.न्युज़
                           हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या स्मृति प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तळमळीच्या नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
                   याविषयी सविस्तर वृत्त असे की, मनस्वी सामाजिक कार्यकर्ते दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांची पाचवी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रम हा शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे (मातृभूमी प्रतिष्ठान), तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पालीमकर (शेतकरी राजा सामाजिक समिती), एस.एम.युसूफ़ (ज्येष्ठ मुक्त पत्रकार) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
                  सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सतीश साळुंखे, प्रा.डॉ. सविता शेटे असणार आहेत.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, मित्र-आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत