Breaking News

सय्यद साजिद यांचे अल्पशा आजाराने निधन


सय्यद साजिद यांचे अल्पशा आजाराने निधन

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा बीड शहरातील जुन्या पिढीतील नेते आणि बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मरहूम सय्यद चांँद साहब (लिडर) लोहार गल्ली, बीड यांचे ज्येष्ठ चिरंजीव सय्यद साजिद सय्यद चांँद यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील रुग्णालयामध्ये निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते.
बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या चांँद कॉम्प्लेक्स मधील सीमा हार्डवेअर दुकान चे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी आज दिनांक २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ०२:०० वाजता खासबाग येथील तकिया कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे. सय्यद कुटुंबीयांच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत