Breaking News

डॉ. पुनम भालेराव यांना एमएच वुमन एक्सिलेन्स २०२६ पुरस्कार प्रदान! बीडच्या लेकीचा युनाय फाउंडेशन कडून पुण्यात सन्मान

डॉ. पुनम भालेराव यांना एमएच वुमन एक्सिलेन्स २०२६ पुरस्कार प्रदानबीडच्या लेकीचा युनाय फाउंडेशन कडून पुण्यात सन्मान

बीड (एस.एम.न्युज़) - जागतिक महिला दिनानिमित्त युनाय फाऊंडेशन कडून आयोजित पुरस्कार समारंभामध्ये डॉ. पुनम भालेराव यांना एमएच वुमन एक्सिलेन्स २०२६ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

बीड शहराच्या रहिवासी असलेल्या सुप्रसिद्ध सौंदर्यतज्ञ डॉ. पुनम भालेराव यांचे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यात असलेले योगदान पाहून त्यांना पुण्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा महागौरव सोहळा पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे दिनांक २१ मार्च २०२६ शनिवार रोजी दुपारी पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त रुक्मिणीताई गलांडे आणि विमेन सेल पुणे मिरर च्या संचालिका शितल बियाणी होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. अदिती निटुरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमेन लीडरशीप प्रोग्राम च्या हेड गौरी निगुडकर होत्या. हा पुरस्कार वितरण सोहळा युनाय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मायाश्री गायकवाड यांनी आयोजित केला होता.

पुरस्कार प्राप्त डॉ. पूनम भालेराव या बीड शहरात स्किनोवेशन क्लिनिक च्या माध्यमातून एक सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. गेल्या वर्षी त्यांनी पुणे शहरात आपले हॉस्पिटल उघडले. तेथेही त्यांनी अल्पावधीतच एक निष्णात सौंदर्यतज्ञ म्हणून ख्याती मिळविली. शिवाय बीडच्या कन्या असल्याने बीड सोबत जुळलेली नाळ तुटू नये म्हणून महिन्यातून एकदा रुग्ण तपासणीसाठी बीडला येवून सेवा देतात. वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असतानाच सामाजिक क्षेत्रातही त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे बीड शहरातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत असून पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत