नुबैद वसीफ़ शेख ने पूर्ण केले रमज़ान चे संपूर्ण रोज़े! नमाज़, शाळा, शिकवणीही सोडली नाही
नुबैद वसीफ़ शेख ने पूर्ण केले रमज़ान चे संपूर्ण रोज़े
नमाज़, शाळा, शिकवणीही सोडली नाही
बीड (एस.एम.न्युज़)
शहरातील आसेफ़नगर भागात राहणारा जेमतेम साडेअकरा वर्षांचा असलेला नुबैद वसीफ़ शेख याने रमज़ान महिन्याचे संपूर्ण रोज़े पूर्ण केले. रोज़े पूर्ण करताना त्याने संपूर्ण महिनाभर एकही नमाज़ सोडली नाही की, एकही दिवस शाळेला दांडी मारली नाही. याशिवाय शाळेच्या शिक्षणाची शिकवणी आणि अरबी मदरशातील शिकवणी सुद्धा सोडली नाही. यासाठी पवित्र रमज़ान महिन्यात दररोज पहाटे ०४:३० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत नुबैद सतत मग्न राहिला. म्हणून त्याचे मोठे काका एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्याचे रमज़ान ईद दिवशी पुष्पहार व भेटवस्तू देऊन अभिनंदन करत सत्कार केला. यावेळी नुबैद चे वडील यमन फॅब्रिकेशन चे संचालक वसीफ़ शेख, काका यशराज हेल्थ क्लब चे संचालक नसीर शेख, काका पोलीस जमादार हनीफ़ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आजी-आजोबा, सर्व काकू, आत्या, सर्व बहिण-भाऊ आणि सर्व नातलग उपस्थित होते. नुबैदने महिनाभराचे रोज़े ठेवून नमाज़ पठण, शाळा आणि शिकवणी ला सुद्धा न चुकता उपस्थित राहिल्याने सर्वांनी त्याचे विशेष कौतुक करून यापुढेही त्याने दरवर्षी रमज़ान महिन्याचे रोज़े आणि इतर शैक्षणिक बाबी अशाच प्रकारे सातत्याने पूर्ण करत राहावे असे शुभ आशीर्वाद दिले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा