बीड नगर परिषदेला जाहिरात रूपी कमानीचा आर्थिक लाभ पण वाहन चालकांना त्रास!
बीड नगर परिषदेला जाहिरात रूपी कमानीचा आर्थिक लाभ पण वाहन चालकांना त्रास!
रमज़ान महिना आला अन् गेला. मीना बाजार लागला संपला. ईद साजरी होऊन तीन दिवस सरले. तरीही जाहिरातीची ही कमान अजून काढण्यात आली नाही. आता या कमानीच्या आडोशाने अलीकडून-पलीकडून अजून कुणी अतिक्रमण करून साईड पंख्यांची जागा बळकावली तर नवल वाटायला नको.
शिवाय या रस्त्यावरून ये-जागा करणाऱ्या वाहन चालकांना या जाहिरात रुपी कमानी मुळे वाहन चालवताना त्रास होत असून अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
बहुतेक ज्या व्यावसायिकाने ही कमान येथे सजविली, त्या व्यावसायिकाकडून बीड नगर परिषदेने जाहिरात रुपात चांगलीच रक्कम घेतली असेल असे वाटते.
अर्थात बीड नगर परिषदेला सुद्धा अशा जाहिरातींची अर्थार्जण करण्याकरिता आवश्यकता आहेच.
पण हे करताना अशा डिजिटल कमानी किंवा बॅनर रहदारीला अडथळा ठरू नये याकडे बीड नगर परिषदेने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे असूनही असे होताना दिसत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा