सकारात्मक परिणाम: बातमीची दखल वाचकांनी एस.एम.न्युज़चे मानले आभार
सकारात्मक परिणाम: बातमीची दखल
वाचकांनी एस.एम.न्युज़चे मानले आभार
बीड (एस.एम.न्युज़) -
शहरातील जिल्हा रुग्णालय रस्त्यावर एक जाहिरातीची कमान गेल्या अनेक दिवसांपासून लावलेली होती. त्या कमानीमुळे चौकातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना पलीकडच्या रस्त्यावरील वाहन दिसत नव्हते. यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. याविषयी वाहन चालकांनी एस.एम.न्युज़शी संपर्क साधून याविषयी सांगितले असता याची बातमी दिनांक २४ मार्च २०२६ मंगळवार रोजी प्रकाशित केली. या बातमीची सकारात्मक नोंद घेण्यात येवून बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन तासाच्या आत जाहिरातीची ही कमान काढण्यात आली. याबद्दल वाहन चालकांनी एस.एम.न्युज़ चे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा