हज़रत बु अलीशाह कलंदर (रह.) पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन
हज़रत बु अलीशाह कलंदर (रह.) पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील आवाटी येथे येत्या ३० मार्च सोमवार रोजी हज़रत बु अलीशाह कलंदर (रह.) पानीपत यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येतात.
आवाटी येथील हज़रत चांँद पाशा वली बाबा यांच्या दरगाह मध्ये येत्या ३० मार्च २०२६, उर्दू तारीख १० शव्वाल १४४७ हिजरी सोमवार रोजी पानीपत येथील हज़रत बु अलीशाह कलंदर (रह.) यांच्या स्मरणार्थ उर्फ कलंदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दरगाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कादर भाई तांबोळी, बाबाचे खादिम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कादरी यांनी दिली.
ऊर्स मुबारक निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बु अलीशाह कलंदर यांची गिलाफ़ चादर दर्शनासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत राहणार आहे. याशिवाय संध्याकाळी नमाज़ ए ईशा नंतर महफिले समाचा कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दरगाहवर विविध रंगाची रोषणाई करण्यात आली असून आलेल्या भाविक भक्तांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले हज़रत वली चांँद पाशा दरगाहवर दरवर्षी विविध धर्माचे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दरगाहवर आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद (लंगर खाना) वाटपाचे कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
याशिवाय दरगाहवर वर्षभरातून तीन धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरे केले जातात.
सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दरगाह ट्रस्टच्या वतीने सुफी हसनैन कादरी (सज्जादा नशीन) तसेच आवाटी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा