Breaking News

चहा विक्रेत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल एआयएमआयएम, एसडीपीआयच्या पाठपुराव्यास अखेर यश

चहा विक्रेत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एआयएमआयएम, एसडीपीआयच्या पाठपुराव्यास अखेर यश

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील कालिका नगर भागात एका चहा विक्रेत्यास विनाकारण मारहाण करून त्याचे नुकसान करणाऱ्या जालिंदर सानप याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआयएमआयएम आणि एसडीपीआय या पक्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलिसांनी अखेर ही कारवाई केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार अकबर रहीम शेख हे चहाचा स्टॉल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ०९:०० मार्च २०२६ रोजी रात्री आरोपी  जालिंदर सानप याने शेख यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ आणि एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष सय्यद आबेद यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान शिकलगार व एसडीपीआयचे शेख अब्दुल कादर व अन्य कार्यकर्त्यांनी सातत्याने पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर ३१ मार्च रोजी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा (F.I.R. No. 0072/2026) नोंदवला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र राख अधिक तपास करत आहेत. आता आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचेही आभार मानले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत