Breaking News

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र सोबतच मिळणार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांचे पत्र

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र सोबतच मिळणार
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांचे पत्र

बीड (एस.एम.न्युज़) - माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित मिळणार असल्याचे बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने म्हटले आहे की, संदर्भिय ठरावानुसार फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ती एकत्रित (Consolidated) देण्यात येणार आहेत. तसेच एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव First Name, Father Name व Surname या क्रमाने छपाई करण्यात येणार आहे.

यासंदर्भात फेब्रुवारी-मार्च 2026 च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास, त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी स्वाक्षरी करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेतच त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त केले आहेत. त्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर अचूक छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे. त्या करिता मंडळाच्या संकेतस्थळावर 'Photo Correction' ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याद्वारे फोटो दुरुस्ती करण्यात यावी.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबत व सदर क्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात First Name, Father Name व Surname त्रुटी उद्भवणार असल्यास त्याबाबतची दुरुस्ती विभागीय मंडळामार्फत तातडीने करुन घेण्याबाबत कार्यवाही करावी तसेच विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरुपात अवगत करुन देण्याबाबतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. असे आदेशीत पत्र बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी काढले आहे.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत