अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेख फारुख यांची मागणी
माजलगाव (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील धारंपुरी परिसरात अल्पवयीन 9 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेख फारुख यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
शेख फारुख म्हणाले की, “अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना समाजात कोणतीही जागा नाही. निरपराध लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.”
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख फारुख यांनी पुढे सांगितले की, “महिलांवर आणि लहान मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शासनाने अधिक कडक पावले उचलली पाहिजेत. अशा प्रकरणांचा जलदगती न्यायालयात निकाल लावून पीडितेला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे.”
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा