स्वस्त धान्य दुकानात एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे धान्य एकदाच येणार अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
मुंबई (एस.एम.न्युज़) - अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम भारतात झाला आहे. या युद्धामुळे भारतात पुरवठा होणारा एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. युद्धाचे आता भारतामध्ये थेट मोठे परिणाम बघायला मिळत आहेत. यादरम्यानच प्रशासनाकडून राज्यातील स्वस्त धान्य दुकानात तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. युद्धाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने सरकार तीन महिन्यांचे धान्य रेशन दुकानांत पोहोचवणार आहे.
राज्यभरातील ५१ हजारपेक्षा जास्त रेशन दुकानांत तीन महिन्यांचे धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानांत एप्रिल, मे आणि जून महिन्याचा धान्यसाठा पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात युद्धाचे परिणाम तीव्र होण्याच्या भीतीने तीन महिन्यांचे धान्य वितरण होणार आहे. गहू आणि तांदळाचा तीन महिन्यांचा पुरवठा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्य सरकार तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी दुकानात पाठवणार आहे. युद्धामुळे डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास धान्य वितरणात अडथळा येण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा