Breaking News

अल्ताफ शेख यांच्या आगामी चित्रपटात आशिकी फेम राहुल रॉय झळकणार

अल्ताफ शेख यांच्या आगामी चित्रपटात आशिकी फेम राहुल रॉय झळकणार

मुंबई (एस.एम.न्युज़) - सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा बीड जिल्ह्याचे जावई आणि गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणेला आपली कर्मभूमी बनविलेले हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेते असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रचंड गाजलेल्या आशिकी या चित्रपटाचे मुख्य नायक असलेले अभिनेते राहुल रॉय यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत आगामी चित्रपट करण्याबद्दल बोलणे केले. यावर राहुल रॉय यांनी होकार दिला.
राहुल रॉय यांनी अल्ताफ शेख यांना अत्यंत आपुलकीने भेट देऊन बऱ्याच विषयांवर चर्चाही केली. या भेटीदरम्यान त्यांचा शांत आणि सरळ स्वभाव वाखाण्याजोगा होता. गप्पांच्या ओघात रॉय यांनी चित्रपट सृष्टीतील अनेक बारीक दुवे ही सांगितले. शिवाय अल्ताफ शेख यांनी आतापर्यंत हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेते म्हणून केलेले कार्य चांगले असून आगामी चित्रपटात आपण निश्चितच सोबत काम करूया असे आश्वासन दिले. यावर अल्ताफ शेख यांनी राहुल रॉय यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत