Breaking News

रमज़ान महिन्यात हिंदू-मुस्लीम बांधवांचा ईफ़्तार!


रमज़ान महिन्यात हिंदू-मुस्लीम बांधवांचा ईफ़्तार!

इस्लाम धर्मात सर्वात पवित्र आणि परोपकाराचा महिना म्हणून रमज़ान महिना ओळखला जातो.
या महिन्यात संपूर्ण जगात फक्त मुस्लिम बांधवच नाही तर सर्वधर्मीय बांधव सुद्धा मुस्लिम बांधवांसोबत रमज़ान महिना साजरा करतात.
या महिन्यात जवळपास प्रत्येक मुस्लिम बांधव संपूर्ण रमज़ान महिन्याचे रोज़े धरतात.
पाच वेळेस नमाज़ पठण, क़ुरआन पठण करतात.
ऐपत असेल तर ज़कात देतात. ज्यांच्याकडे चांगल्या प्रमाणात पैसा आहे असे मुस्लिम बांधव आपापल्या परीने रोज़ा ईफ़्तार चे आयोजन करतात.
याशिवाय हिंदू-मुस्लिम बांधव मिळून संयुक्तरित्या सुद्धा ईफ़्तार पार्टी ठेवतात.
अशा ईफ़्तार पार्ट्यांमध्ये रोज़ेदार असलेल्या मुस्लिम बांधवांबरोबर बेरोज़ेदार हिंदू बांधव ही ईफ़्तार करण्यासाठी बसतात. वास्तविक पाहता ते रोज़े धरत नाहीत.
अशा अवस्थेत त्यांनी रोज़ा सोडण्यासाठी न बसता वाढपीची भूमिका घेतली आणि फक्त रोज़ेदार असलेल्या मुस्लीम बांधवांना ईफ़्तार करण्यासाठी बसविले तर अजून जास्तीत जास्त संख्येत रोज़ेदार मुस्लिम बांधव अशा ईफ़्तार पार्ट्यांमध्ये येवू शकतात.
तेव्हा हिंदू बांधवांनी मग ते नेते, कार्यकर्ते किंवा सर्वसामान्यजण कुणीही असो सर्वांनी ही बाब लक्षात घेऊन फक्त मुस्लिम बांधवांना ईफ़्तार करण्यासाठी बसवावे आणि स्वतः त्यांना वाढावे. हे अजून जास्त संयुक्तिक वाटेल, असे आवर्जून सांगावेसे वाटते. 
कारण अशा ईफ़्तार पार्ट्यांमध्ये ज्यांना रोज़े असतात ते वाढताना दिसतात आणि जे रोज़ा नसतात ते बसून ईफ़्तार करताना दिसतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत