Breaking News

बीड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी दक्षता बाळगावी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चंद्रकांत शेळके यांचे आवाहन

बीड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी दक्षता बाळगावी

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी  चंद्रकांत शेळके यांचे आवाहन

बीड (एस.एम.न्युज़) - तालुक्यात पुढील काही तासात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय भू-विज्ञान मंत्रालयाच्या Damini Lightning Alert प्रणालीद्वारे दर्शविण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सर्व नागरिकांना पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे -
१) शक्यतो उघड्या मैदानात, शेतात किंवा टेकड्यांवर थांबणे टाळावे.
२) मोठ्या झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा लोखंडी संरचनेजवळ आश्रय घेऊ नये.
३) मोबाईल चार्जिंग, टीव्ही, फ्रिज यांसारखी विद्युत उपकरणे तात्पुरती बंद ठेवावीत.
पावसाळी वातावरणात वाहन उघड्या जागेत पार्क करू नये.
४) शेतकरी बांधवांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा व शेतीकाम थांबवावे.
४) लहान मुले व जनावरे यांना घरात सुरक्षित ठेवा.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चंद्रकांत शेळके, बीड यांनी केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत