बीड शहर स्वच्छतेला येऊ लागलाय रंग; त्यात आता पडू नये भंग! निजाम शेख, मुजीब शेख यांनी शहर स्वच्छतेचा विडा उचलला
निजाम शेख, मुजीब शेख यांनी शहर स्वच्छतेचा विडा उचलला
बीड शहरात एकाधिकारशाहीच्या अनेक वर्षांत स्वच्छतेची लागलेली वाट आता स्वच्छता सभापती निजाम शेख आणि नगराध्यक्षा प्रतिनिधी मुजीब शेख या जोडीमुळे सुरळीत होण्याकडे वाटचाल करू लागली आहे. यामुळे आता बीड शहर स्वच्छतेला खऱ्या अर्थाने रंग येऊ लागला असून त्यात आता कोणत्याही कारणामुळे भंग पडू नये.
वर्षानुवर्षापासून बीड नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला मोठ्या प्रमाणात मरगळ आली होती. स्वच्छता निरीक्षकापासून ते मुकादम आणि कर्मचाऱ्यांपर्यंत कुणीही शहर स्वच्छतेकडे गांभीर्याने पहात नव्हते. याचाच परिपाक म्हणून अनेक स्वच्छता कामगार हे फक्त मस्टरवर उपस्थित असायचे परंतु फिल्डवर जाऊन काम करताना दिसायचे नाही. अशा कामचुकारांनी हजेरी मस्टरवर उपस्थिती लावण्यासाठी दरमहा चिरीमिरी देऊन सेटलमेंट ही केलेली होती. एकीकडे शहर मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिथे नवीन कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे तिथे आहे तेच कर्मचारी कर्तव्यावर जात नसल्याने आणि त्यांच्या उपस्थितीकडे एकाधिकारशाहीमुळे सत्तेत असलेले पदाधिकारीही लक्ष देत नसल्याने बीड शहराला मोठ्या प्रमाणात अक्राळ विक्राळ गलिच्छ रूप आले होते. यंदा मात्र काही महिन्यापूर्वीच झालेल्या बीड नगरपरिषद निवडणुकीत सत्तेत खांदेपालट झाले. नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदी प्रेमलताताई पारवे या विराजमान झाल्या. त्यांनी नगराध्यक्षा प्रतिनिधी म्हणून मुजीब शेख यांना पुढे केले आहे तर स्वच्छता सभापतीपदी निजाम शेख यांची निवड झाली आहे. ही तरुण तडफदार जोडी शहराचे गलिच्छ विदारक चित्र बदलण्याकरिता पहाटेची साखर झोप मोडून शहर स्वच्छतेसाठी झटून कामाला लागली आहे. फिल्डवर दोन नेते दररोज पहाटे जातीने उपस्थित राहत असल्याने मस्टरवर उपस्थित राहून फिल्डवर अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांना जड जात आहे. यामुळे असे कामचुकार कामगार आतापासूनच या जोडी विरोधात वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवू लागल्याचे बोलले जात आहे. ज्यात या जोडीवर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप करून शहर स्वच्छतेची मोहीम थंड व्हावी किंवा बंद पडावी. कामचुकारांना पूर्वीप्रमाणे पुन्हा फक्त मस्टरवर उपस्थित राहून फिल्डवर अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी. हा एकमेव षडयंत्र यामागे असल्याचे बोलले जात आहे. ही बाब लक्षात घेता निजाम शेख व मुजीब शेख या जोडीने सुरू केलेल्या बीड शहर स्वच्छतेच्या रंगात कोणत्याही कारणाने भंग पडू नये. बकाल व गलिच्छ झालेले बीड शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर व्हावे.
लेखन - एस.एम.युसूफ़
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा