गायिका डॉ. प्रियांका देशमाने यांना संगीत विषयात पीएचडी गायक एम.एम.शेख, कृष्णा पांगरे यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव
गायिका डॉ. प्रियांका देशमाने यांना संगीत विषयात पीएचडी
बीड (एस.एस.न्युज़) - नांदेड जिल्ह्याच्या सुकन्या तथा बीड जिल्ह्याच्या सून असलेल्या डॉ. प्रियांका गणेश देशमाने यांनी संगीत विषयात नुकतीच पीएचडी प्राप्त केली आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायक एम.एम.शेख व संगीतकार कृष्णा पांगरे यांनी सर्व स्थानिक गायक-गायिकांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरांजली संगीत अकॅडमी मध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभात हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला.
मुळच्या नांदेड जिल्ह्यातील असलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियांका मनाठकर (डुकरे) यांची लग्नगाठ बीड येथील शिक्षक असलेले गणेश देशमाने यांच्याशी बांधली गेली.
लग्नाअगोदर डॉ. प्रियांका यांच्या माहेरी गीत-संगीताचे वातावरण असल्याने त्यांना बालपणापासूनच गीत-संगीताची गोडी होती. म्हणूनच त्यांनी संगीत विषयात बीए, एमए केले तसेच संगीत अलंकार ची उपाधी ही मिळविली. त्यांनी सलग दहा वर्षे संगीताचे शिक्षण घेतले नंतर बीएड सुद्धा केले. त्यांनी नांदेड येथील आकाशवाणी केंद्राच्या संगीत कार्यक्रमात ही सहभाग नोंदवला. संगीत क्षेत्रातील त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना नांदेड, पुणे, मुंबई, लातूर येथे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. शिवाय नागपूर येथे सारेगमप या टीव्ही शो मध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या.
अशा या गोड गळ्याच्या गायिकेने संगीत विषयात नुकतीच पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचा अभूतपूर्व असा सत्कार सोहळा घेण्यात आला. हा सत्कार सोहळा गायक एम.एम.शेख आणि कृष्णा पांगरे यांनी आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात गायिका डॉ. प्रियांका देशमाने यांचे पती गणेश देशमाने, राहुल गवळी, सरकटे, संध्या भोसले, ॲड. वर्षा दळवी, ॲड. मनीषा दळवी, अश्विनी दळवी, गौतम कांबळे, ललिता लांडगे, हर्ष साळवे, जनार्दन वाघमारे, डॉ. जोशी, ॲड. ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कार समारंभात बोलताना डॉ. प्रियांका देशमाने म्हणाल्या की, लग्नाअगोदर माहेरी असताना मी संगीत क्षेत्रात जे काही साध्य केले ते माझ्या व माझ्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा संगीत क्षेत्राबद्दल मला असलेल्या आवडीमुळे पती गणेश देशमाने यांच्यासह माझे सासू-सासरे यांनीही खूप पाठबळ दिले. सर्वांच्या सहकार्यामुळेच मी संगीत क्षेत्रात मार्गक्रमण करीत असून आज पीएचडी सुद्धा प्राप्त केली आहे. याबद्दल माझ्या पतीसह सासू-सासर्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे असे म्हटले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा