संपादक तय्यब शेख यांना मातृशोक तकीया कब्रतानात सकाळी १० वाजता दफणविधी होणार
बीड (एस.एम.न्युज़) - सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक तथा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तय्यब शेख आणि निवासी संपादक मुबीन शेख यांच्या मातोश्री लियाकतबी सिकंदर शेख यांचे शनिवारी रात्री प्रदीर्घ आजाराने ११.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्युसमयी त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज रविवार दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता खासबाग येथील तकीया मस्जिद मध्ये त्यांची नमाज़ ए जनाज़ा पठण करण्यात येणार असून तकीया कब्रस्तानमध्ये दफणविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात शेख तय्यब, शेख मुबीन ही दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शेख कुटुंबियाच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा