Breaking News

तय्यब सिकंदर शेख यांनी संचालकपदाचे सार्थक केले

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा चौपटीने वाढली

तय्यब सिकंदर शेख यांनी संचालकपदाचे सार्थक केले

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना आता मिळणार २० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज

बीड (एस.एम.न्युज़) - अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तथा सायं. दैनिक बीड रिपोर्टर चे संपादक तय्यब सिकंदर शेख यांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडून दिले जाणारे पाच लाखांवरचे शैक्षणिक कर्ज वाढवून द्यावे, अशा आशयाची मागणी तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्यासह अल्पसंख्यांक सचिव जयवंश रुचेश यांच्याकडे केली होती. त्यावेळी बैठकीत चर्चाही झाली. मंडळामध्ये ती मंजूरही करण्यात आली. चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणाऱ्या ५ लाखांच्या कर्जाची २० लाखांपर्यंत वाढ केली. या निर्णयाचे स्वागत करत संचालक शेख तय्यब यांनी सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे आभार मानले. शैक्षणिक शुल्कात सातत्याने वाढ होत असल्याने पूर्वीची कर्ज मर्यादा अपुरी पडत असल्याची बाब लक्षात घेऊन संचालक शेख तय्यब यांनी अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून कर्ज मर्यादा वाढवण्याची ठोस मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत अध्यक्ष मुश्ताक अंतुले तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत आढावा बैठकीत कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय जाहीर केला.
अल्पसंख्यांक विकास विभागाच्या आढावा बैठकीत विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवून दिलेल्या धोरणांनुसार विभागाची वाटचाल सुरू असल्याचे नमूद करण्यात आले.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रभावीपणे राबविणार

बैठकीत 'डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना' अंतर्गत पायाभूत सुविधा अनुदान २ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतिगृहे तातडीने पूर्ण करण्याचे, अल्पसंख्यांक बहुल भागांतील विकासकामांना गती देण्याचे आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अल्पसंख्यांक तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विविध खात्यातील रिक्त पदे तातडीने भरणार

अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या वक्फ मंडळ, वक्फ न्यायाधिकरण आणि हज समितीतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले असून अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यावर भर देण्यात येणार आहे.

महामंडळाच्या सर्व संचालकांनी मानले आभार

संचालक शेख तय्यब यांनी ही प्रमुख मागणी लावून धरली होती. आढावा बैठकीत सुनेत्राताई पवार यांनी मागणी मंजूर करत विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, संचालक तय्यब शेख यांच्यासह मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सर्व संचालकांनी ताईंचे आभार मानले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत