विकासासाठी विरोधी पक्षात मातब्बर तर सत्तेत नवागत हवे - एस.एम.युसूफ़
विकासासाठी विरोधी पक्षात मातब्बर तर सत्तेत नवागत हवे!
बीड नगर परिषदेत अशीच स्थिती
लेखन - एस.एम.युसूफ़
गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश काहीही असो तिथे विकास करायचा असेल तर विरोधी पक्षात मातब्बर आणि सत्तेत नवागत हवेत. यावेळी बीड नगर परिषदेसाठी नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नेमकी अशीच स्थिती असल्याने बीड शहरवासियांना आता शहराचा खरोखरच विकास होईल असा विश्वास वाटू लागला आहे.
बीड शहराचा विचार केला असता येथील नगरपरिषदेत गेल्या जवळपास ३०-३५ वर्षांपासून एकाच घराण्याची सत्ता होती. एवढा मोठा काळ एका घराण्याचा किंवा कुटुंबीयांचा वरदहस्त सत्तेत राहिल्याने शहरातील नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधा ज्यात प्रामुख्याने चांगले रस्ते, नाल्या, नळांना वेळेवर पिण्याचे पाणी, अखंडित वीज पुरवठा, कचऱ्याचा योग्य निचरा यापेक्षा जास्त काही अपेक्षा नसताना ते सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून मिळाले नाही.
जनतेच्या सत्ताधाऱ्यांकडून असलेल्या या किमान अपेक्षाही वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून जर सत्ताधारी पूर्ण करू शकत नसतील तर अशा राजकारण्यांचा उपयोग काय?
पाणी एका जागी जास्त दिवस साचले तर त्याचे रूपांतर गलिच्छ डबक्यात होते. तशीच अवस्था एक हाती सत्ता जर उपभोगली जाऊ लागली तर तेथील विकासाचीही होते.
असाच प्रकार गेली अनेक वर्षे बीड शहरात होता. म्हणूनच संपूर्ण बीड शहराची अवस्था ही गलिच्छ डबक्यासारखीच झालेली आहे. या अवस्थेने कंटाळलेल्या बीड शहरवासियांनी उशिराने का होईना मातब्बरांना विरोधी बाकावर बसविले तर नवागतांना सत्ताधारी बनविले.
सुदृढ लोकशाहीसाठी मातब्बर सुद्धा विरोधी बाकावर बसलेले असावे. त्यांच्या मातब्बरपणामुळे त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर चांगल्या प्रकारे वचक ठेवता येतो. अन्यथा सत्ताधाऱ्यांना मोकळे रान मिळते.
जे आतापर्यंत बीड शहरवासीयांनी पाहिलेच आहे. पुन्हा अशी अवस्था होऊ नये. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा. शहरवासीयांना चांगले रस्ते, नाल्या, नळांना वेळेवर पाणी, अखंडित वीज पुरवठा मिळावा याकरिता यापुढेही मातब्बरांना कायम विरोधात ठेवून नवागतांना सत्तेत ठेवावे लागेल.
बीड नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून याचा परिणाम दिसतोच आहे. ज्या मातब्बरांना जनतेकडून आलेली निवेदने, तक्रारी अर्ज घेऊन फक्त थप्पी ला लावायची सवय होती, त्यांचेच उत्तराधिकारी आता विरोधी पक्षात असल्याने त्यांच्याकडून मोठमोठ्या नेत्यांसह मोठ्या अधिकाऱ्यांसमोर वेगवेगळ्या प्रश्नांची निवेदने दिली जाऊ लागली आहेत.
हे परिवर्तन आपल्या भारत देशाच्या लोकशाहीत जनतेला मिळालेल्या मताधिकारामुळे झाले आहे. म्हणूनच विकासासाठी विरोधी पक्षात मातब्बर तर सत्तेत नवागत हवे याची प्रचिती येऊ लागली आहे. बीड नगर परिषदेत अशीच स्थिती असल्याने आता बीड शहराचा खोटा आणि कागदी नाही तर खराखुरा विकास होईल अशी अपेक्षा बीड शहरवासियांना आहे.
*लेखन - एस.एम.युसूफ़*
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा