Breaking News

आहेराचे शर्ट पॅन्ट पीस/साड्या ( विकतची अडगळ????):-


आहेराचे शर्ट पॅन्ट पीस/साड्या ( विकतची अडगळ????):-

लग्नात एक प्रथा म्हणून बाकी आहेराबरोबर शर्ट पीस, पँट पीस, साड्या ब्लाऊज पीस, आणि कसले तरी लहानसहान गिफ्ट देतात. नाही दिले तर त्याना उगाच जन्मभर टोमणे ऐकावे लागतात! बऱ्याच वेळेस इच्छा नसतानाही अश्या कुडमुड्या गिफ्ट ची देवाण घेवाण करावी लागते!

या गिफ्ट देण्याच्या  स्वस्त वस्तूंचे एक वेगळे मार्केट असते . मला एका होलसेल व्यापाऱ्याने सांगितले होते की शर्टपीस व , पँटपीस दोन्ही मिळून एकत्र व्यवस्थित आकर्षक पैक केलेले वर नामांकित कंपनीचे नाव असलेले आकर्षक शर्ट पँट पीस होलसेल बाजारात 80-90 रूपयाना होलसेलर ना विकत मिळतात, त्यावर पाच दहा रुपये मार्जिन ठेऊन मग शंभर च्या आत ते विकतात!
टेलर कडे गेल्यावर बऱ्याच वेळा असे कळते की शर्ट पँट पिस ची साईज खूप कमी असते, आपण शिवू शकत नाही, वर क्वालिटी खराब असली की शिवण चार्ज सुद्धा फुकट गेला!! शंभर रुपयांच्या कपड्या साठी  सातशे आठशे रुपयांची शिलाई फुकट!!

म्हणून असे आहेराचे कपडे टेलर पर्यंत पोहोचतच नाहीत! घरीच पडून राहतात , कधी कुठे लग्न वैगरे कार्यक्रम असेल तर हेच कपडे आहेर म्हणून कोणाच्या तरी गळ्यात मारायचा!
म्हणजे या आहेराच्या कपड्यांची घरे फक्त बदलत असतात इतकेच!! टेलर कडे कधीही जात नाहीत!

स्वस्तातली आहेराची  वर आकर्षक स्टिकर असलेली चकचकीत भांडी काही दिवसांनी फाटतात! भंगार वाला सुद्धा ती घेत नाही! उगाच अडगळ होऊन बसते!! यात काही बदल व्हावा असे वाटते, पण होणार नाही असेही वाटते ,कारण रूढी परंपरा एकदम सहसा जात नाहीत!
(तुम्हाला काय वाटते?
..,, गणेश शेटे
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत