कैसा हराया! म्हणजे नेमके काय?
कैसा हराया! म्हणजे नेमके काय?
ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा प्रभागातून एआयएमआयएम च्या तिकिटावर निवडून आलेल्या सहर शेख या नगरसेविकेने निवडणुकीनंतर झालेल्या सभेत कैसा हराया हे फक्त दोन अक्षरी शब्द उच्चारल्यामुळे काही राजकीय पक्षांनी फक्त ठाणेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नवीन वादंग उठवले आहे. या अनुषंगाने एकीकडे काही विरोधी पक्ष चांगलेच पेटल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कैसा हराया म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडला आहे.
वास्तविक पाहता रंगांना जातीजातीत, धर्माधर्मात वाटण्यामागे खरे तर राजकारण्यांचाच हात आहे. त्यांनीच भगव्या रंगाला हिंदूंचा, हिरव्याला मुसलमानांचा, निळ्याला दलितांचा, पिवळ्याला धनगरांचा अशाप्रकारे वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळ्या जातीधर्मात रंगवून (वाटून) घेतले आहे. यामुळे या रंगांचा काही एक दोष नसताना ते बिचारे विनाकारण वेगवेगळ्या जातीजातीत व धर्माधर्मात वाटले गेले.
याच मानसिकतेमुळे जेव्हा ठाणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली तेव्हा मुंब्रा विभागातून एआयएमआयएम च्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या सहर शेख यांनी निवडून आल्यानंतर केलेल्या भाषणात कैसा हराया असे शब्द उच्चारले. यामुळे फक्त ठाणे-मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी मोठे वादंग उठवले आहे. या अनुषंगाने कैसा हराया हे फक्त दोनच शब्द असलेले वाक्य अनेक विरोधी पक्षांना चांगलेच झोंबल्याचे दिसते. तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा कैसा हराया म्हणजे नेमके काय असा प्रश्नही पडला आहे. या कैसा हराया चे दोन अर्थ सुद्धा निघतात. त्यातील पहिला म्हणजे कसे हरविले तर दुसरा म्हणजे कसा हिरवा आला. अर्थातच कैसा हराया, कैसा हरा आया. आता या दोन्ही मधून हे दोन शब्द उच्चारणाऱ्या नगरसेविकेला नेमके कोणते शब्द व अर्थ अभिप्रेत आहे हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण या दोनच शब्दामुळे राज्यभरातील काही राजकीय पक्षांमध्ये मोठे वादंग उठले आहे, हेही तेवढेच खरे!
लेखन - एस.एम.युसूफ़
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा