ना. पंकजाताईंनी भारतीय संविधानाला खऱ्या अर्थाने मान दिला! उच्चशिक्षित ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे पाटील यांची स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती
ना. पंकजाताईंनी भारतीय संविधानाला खऱ्या अर्थाने मान दिला
उच्चशिक्षित ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे पाटील यांची स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती
बीड (एस.एम.न्युज़) - भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी एकनिष्ठतेला न्याय देत बीड नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य पदी ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे पाटील यांची नियुक्ती केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे व रुक्मिणी नवनाथराव यांनी वार्ड क्रमांक २५ मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची पूर्ण तयारी दर्शवली होती व निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती परंतु आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी रात्री ११:०० वाजता भ्रमनध्वनी वरून नवनाथ शिराळे पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवारी अर्ज आपण भरू नका अशी विनंती विनंती केली होती. त्यांच्या विनंतीस मान देऊन ॲड. गोविंद शिराळे आणि रुक्मिणी नवनाथ शिराळे यांचे अर्ज नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी भरलेच नव्हते म्हणून याबाबत डॉ. सारिका ताई योगेश क्षीरसागर यांनी गटनेता या नात्याने स्वतः जिल्हा अधिकारी यांच्या ऑफिस मध्ये ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे यांची नंबर एक उमेदवारी अर्ज शिफारस केल्याने ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे हे बीड नगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी बिनविरोध निवडून आले. यामुळे बीड शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कार्य काळापासून एकनिष्ठ एक तत्व असणारे जसे की प्रभुराम चंद्राचे देखील एक व्रत आहे एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी तसेच प्रकारे नवनाथ अण्णा यांचे देखील व्रत अतिशय तशाच प्रकारे कडक आहे. त्यांनी देखील पक्षाशी एकनिष्ठता दाखवून आजपर्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचे जाळे बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये पक्ष वाढीसाठी विणलेले आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याची पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी मा. श्री नवनाथ जी अण्णा शिराळे पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव बीड जिल्हा सत्र न्यायालयातील सुप्रसिद्ध ॲड. गोविंदा शिराळे पाटील यांची स्वीकृत सदस्य म्हणून बीड नगरपालिकेमध्ये नुकतीच निवड केली आहे. यामुळे बीड शहरासह जिल्ह्यामध्ये एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण ॲड. गोविंदा शिराळे पाटील हे अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत वकील व उच्चशिक्षित असल्यामुळे बीड शहराच्या विकासाच्या बाबतीत त्यांना सखोल माहिती आहे. नगरपालिका प्रशासनाकडून कोणत्या ठिकाणी विकास करायचा, कशाप्रकारे तो विकास करून घ्यायचा याबाबत त्यांना सखोल अभ्यास असल्याने आता बीड शहराचे नंदनवन होण्यासाठी वेळ लागणार नाही. असे बीड शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे. बीड नगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार अपहार एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नाही. भाजपाचे नेते हे होऊ देणार नाहीत असा देखील ठाम विश्वास बीड शहरातील जनतेला असल्यामुळे बीड शहरातील जनतेमध्ये एक उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. आता जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी बीड शहरातील सुज्ञ नागरिकांना अपेक्षा आहे. असे सध्या बीड शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे.
"भारतीय संविधानाला खऱ्या अर्थाने मान मिळाला!"
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी बीड नगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी ॲड. गोविंदा नवनाथ शिराळे पाटील यांची नियुक्ती करून एकनिष्ठतेला तर न्याय दिलाच शिवाय स्वीकृत सदस्य पदासाठी आपल्या भारतीय संविधानात अधोरेखित केलेल्या मुल्यांनाही मान दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा