Breaking News

एस.एम.युसूफ़ यांची मुक्त पत्रकारिता अभिमानास्पद - रमेशराव गंगाधरे


एस.एम.युसूफ़ यांची मुक्त पत्रकारिता अभिमानास्पद - रमेशराव गंगाधरे

पत्रकारितेत बारा वर्षे पूर्ण केल्याबद्दल हृदयी सत्कार

बीड (एस.एम.न्युज़) - एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ हे बीड जिल्ह्यातील स्थानिक आणि विभागीय वृत्तपत्रात गेल्या १२ वर्षांपासून (एक तप) सातत्याने मुक्त पत्रकारिता करत आहेत. त्यांची पत्रकारिता अभिमानास्पद आहे. असे गौरवोद्गार त्यांचे हृदयी सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी काढले.

यापुढे बोलताना गंगाधरे यांनी म्हटले की, एस.एम.युसूफ़ यांनी नुकतेच ३० डिसेंबर रोजी पत्रकारिता क्षेत्रात एक परखड, सडेतोड, सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेला हाडाचा खंबीर पत्रकार म्हणून १२ वर्षे (एक तप) पूर्ण केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात एक तपापासून लिखाण करणारे एस.एम.युसूफ़ कोणत्याही स्थानिक किंवा विभागीय वृत्तपत्राकडून एक रुपयाचं मानधन न घेता आणि समाजाकडून ही कोणतीही अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजातील समस्या व प्रश्नांवर लिखाण करतात. स्थानिक पातळीवरील समस्या व प्रश्न असो की, जिल्हा पातळीवरील असो ते आपल्या लेखणी द्वारे या समस्या व प्रश्नांची उकल सविस्तरपणे आपल्या बातम्या व लेखांच्या माध्यमातून वृत्तपत्रातून करतात. त्यांनी आतापर्यंत असेही अनेक विषय मांडले आहेत जे राज्य किंवा देश पातळीशी निगडीत होते. त्यासाठी फक्त वृत्तपत्रातून बातमी देण्यापुरते ते लक्ष वेधत नाहीत तर उचललेले प्रश्न धसास लावण्यासाठी अनेकदा संबंधित शासन-प्रशासनाला निवेदनेही देतात. ज्यामुळे समस्या व प्रश्नांना वाचा फुटते असेही म्हटले. यावेळी जलील मोमीन, श्यामराव तुपे, ॲड. सय्यद सरफराज़, शेख लईख़ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत