Breaking News

उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

व्हीव्हीपॅट आवश्यक संख्येत उपलब्ध नसल्यास निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

नागपूर (एस.एम.न्युज़) - नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत अपेक्षेप्रमाणे त्या ईव्हीएम मशीन वरच होणार आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅट मशीन लावणे बंधनकारक करावे अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
यावर उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ईव्हीएम मशीन वरच घ्यायचे तर त्यासोबत व्हीव्हीपॅट मशीन ठेवणे आवश्यक आहे. ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट उपलब्ध न केल्यास निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या असे खडे बोल सुनावल्याने निवडणूक आयोगाला चांगलाच दणका बसला आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनचाच वापर होणार आहे. पण यामुळे मतदाराने कोणाला मतदान केले हे समजावे म्हणून ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन लावणे आवश्यक आहे. पण ती मशीन लावणे अशक्य आहे असे सांगण्यात आल्याने या विरोधात काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने व्हीव्हीपॅट मशीन आवश्यक असून जर शक्य असेल तर मग निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असे निर्देश देत निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे. न्यायालयाने व्हीव्हीपॅट ची मतदानाच्या पारदर्शकतेसाठी आणि मतदारांना विश्वास पटावा की, मी कोणाला मतदान केले आहे यासाठी आवश्यक आहे. याबाबत आधीच न्यायालयाने म्हटले आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायमूर्ती यांच्यासमोर सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे लोकशाही बळकटी साठी व्हीव्हीपॅट आवश्यक आहे. यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने न्यायालय तेव्हा काय निर्णय घेणार? व्हीव्हीपॅट मशीन असणार की, निवडणुका बॅलेट पेपरवर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत