Breaking News

अत्तार वेल्फेअर ट्रस्ट कडून सय्यद हसीन अख्तर यांचा सत्कार

मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती

बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे अध्यक्ष म्हणून सय्यद हसीन अख्तर यांची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर अत्तार वेल्फेअर ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या छोटेखानी कार्यक्रमात सय्यद हसीन अख्तर यांचा पुष्पगुच्छ, “खैर-ए-उम्मत” पुस्तक, शाल आणि पेन सप्रेम भेट देण्यात आले.
या कार्यक्रमात अत्तार वेल्फेअर ट्रस्टचे सचिव अकबर अत्तार, रहनुमा-ए-मिल्लतचे अध्यक्ष मौलाना तारिक अन्वर, ट्रस्टचे सदस्य परवेज अत्तार, आदिल अत्तार, सद्दाम अत्तार, अयान अत्तार, नवीद अत्तार, फैजान अत्तार यांची उपस्थिती होती.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत