*मतदारांनो, काळ वैऱ्याचा सुरू झालाय, तेव्हा थोडं जपून!*
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे. वेळ अत्यंत कमी असल्याने प्रचाराला जोर येणार आहे. यामुळे रात्र नव्हे तर काळ वैऱ्याचा सुरू झालेला आहे. तेव्हा मतदारांनी निवडणूक काळापासून ते निकाल लागेपर्यंत थोडं जपून रहावे.
कधी नव्हे ते यंदा फार मोठ्या लांबलचक खंडानंतर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कार्यकाळ संपून चौथं वर्ष सुरू आहे. तेव्हा आता कुठे ही निवडणूक लागली आहे. या मोठ्या खंडामुळे नगरसेवक, नगराध्यक्ष होण्यासाठी अनेक हौसे, नवसे, गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. अनेक पक्ष आणि अनेक उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार आहेत. या काळात मतदार मनात असलेल्या व आवडणाऱ्या उमेदवारांना पुढे येऊन सहकार्य करतात. वास्तविक पाहता आपल्या भारत देशात गुप्त मतदान पद्धत असतानाही अनेक मतदार हे उघडपणे कुणाची बाजू घेऊन तर कुणाला विरोध करून निवडणुकीत रमताना दिसतात. निकाल लागल्यानंतर निवडून येणाऱ्याचे समर्थक आनंद व्यक्त करतात तर पडलेल्यांचे समर्थक हिरमुसले होऊन जातात. यानंतर मात्र निवडून आलेले आणि पडलेले असे सर्वचजण एक दुसऱ्यांच्या गळ्यात गळे घालून राजकारणाचा आनंद घेतात मात्र या दोघांनाही निवडणूक काळात समर्थन देणाऱ्यांमध्ये आपसात वैर निर्माण होते. असे चित्र प्रत्येक निवडणूकीनंतर दिसते वास्तविक पाहता निवडून येणारा वैयक्तिक तर सोडा सामाजिक कार्य सुद्धा व्यवस्थितरित्या करत नाही. तर पडलेला आपण पडलेलो आहे असे म्हणत समस्यांवरून, प्रश्नांवरून काढता पाय घेतो. अशा अवस्थेत सर्वसामान्य मतदारांचीच गोची होते आणि त्यांचे निवडून आलेल्या सह पडलेल्या सोबत आणि दोघांच्या कार्यकर्त्यांसोबतही पुढील निवडणुकीपर्यंत किंवा कायमस्वरूपी वैर निर्माण होते. ही बाब शहरातील अनेक प्रभागांमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर दिसून येते. तेव्हा मतदारांनो आता रात्र नव्हे काळ वैऱ्याचा सुरू झालाय तेव्हा थोडं जपून रहा कोणत्याही उमेदवारासाठी झटताना वैर निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.
*- एस.एम.युसूफ़*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा