Breaking News

ज्येष्ठ साहित्यिका फातिमा मुजावर यांचे निधन

पनवेल (एस.एम.न्युज़) - येथील ज्येष्ठ साहित्यिका फातिमा बालेखान मुजावर यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्या मूळच्या कराडच्या असून नोकरीनिमित्त दीर्घकाळ पनवेलमध्ये वास्तव्यास होत्या. पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख, तसेच प्र. प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. 

त्या उत्कृष्ट कवी, गझलकार होत्या. त्यांनी मराठी, हिंदी व उर्दू भाषांमधून विपुल काव्य, गझललेखन केले. त्यांचे रोशन, रौजन, पान मनाचे, गुलदस्ता, माँ की सौगात, आवाज-ए-वतन आदी कविता, गझलसंग्रह प्रकाशित आहेत. पनवेल गझल ग्रुपच्या त्या सदस्य होत्या. त्यांच्या मागे पती बालेखान मुजावर, दोन मुले नुरुल हसन, नजमुल हुसेन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुजावर परिवाराच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत