विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित होणार; विद्युत ग्राहकांकडे ३६ कोटी २२ लाखांची थकबाकी
विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित होणार
विद्युत ग्राहकांकडे ३६ कोटी २२ लाखांची थकबाकी
बीड (एस.एम.न्युज़) - वीज ग्राहकांनो वीजबील भरले का ? नाही! मग तुमचा वीजपुरवठा खंडित होणार तत्पूर्वी त्वरीत वीजबील भरा. विज ग्राहकांकडे नोव्हेंबर अखेर ३६ कोटी २२ लक्ष रूपयांची थकबाकी.
महावितरणने नोव्हेंबर महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून गेल्या २६ दिवसात केवळ ६१ टक्केच वसुलीचे उदिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत चार दिवसात महावितरणला १४ कोटी २ लाख रूपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत बीजबीलांचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करावी लागेल असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या बीड मंडळासाठी वरिष्ठ कार्यालयाने लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील वीजबील वसुलीसाठी नोव्हेंबर महिन्याचे चालू बिलाचे ३६ कोटी २२ लाख व थकबाकीचे १७२ कोटी ९६ लाख असे एकत्रीत २०९ कोटी १७ लाख रूपये वीजबीलापोटी थकीत आहेत.या थकबाकीतून नोव्हेंबर अखेर किमान ७४ कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मुख्यालयाने दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत मागील २६ दिवसात केवळ २२ कोटी २० लाख रूपयांची वीजबील वसुली झालेली आहे. हे प्रमाण खूपच कमी असून येणाऱ्या चार दिवसात उर्वरीत थकबाकी सोडून चालू महिण्याचे १४ कोटी २ लाख रूपयांची वसुली होणे महावितरणसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. वसुलीसाठी अधीक्षक अभियंता, सर्व कार्यकारी अभियंते तसेच मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी दारोदार फिरत आहेत, मात्र जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरणसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही.
बीड मंडळा अंतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई विभागातील लघुदाब वर्गवारीच्या वीजग्राहकांकडे नोव्हेंबर महिण्याची १७ कोटी २१ लाख थकीत असून कालपर्यंत ९ कोटी ८१ लाख रूपये वसुली झाली आहे. तर बीड विभागातील वीजग्राहकांकडे १९ कोटी १ लाख थकीत असून कालपर्यंत १२ कोटी ३९ लाख रूपये वसुली झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण आत्तापर्यंतचे अत्यल्प प्रमाण आहे. अंबाजोगाई १ व २ उपविभागामध्ये ६ कोटी ३ लाख्, धारूर उपविभागामध्ये १ कोटी ५५ लाख, केज उपविभागात २ कोटी ३० लाख, माजलगाव उपविभागात २ कोटी ८२ लाख, परळी उपविभागात ३ कोटी २० लाख, तेलगाव उपविभागात १ कोटी ३१ लाख, आष्टी उपविभागात १ कोटी ९२ लाख, बीड ग्रामीण व शहर उपविभागात १२ कोटी २६ लाख, गेवराई उपविभागात २ कोटी ७० लाख, पाटोदा उपविभागात १ कोटी २१ लाख तर शिरूर कासार उपविभागात ९४ लाख रूपये नोव्हेंबर महिण्यात वसूल करण्याचे उदिष्ट आहे. थकबाकी थकबाकीदार वीजग्राहकांना एसएमएस द्वारे, प्रत्यक्ष फोन करून तसेच वीजकायद्यान्वये रितसर नोटीस कालावधी उलटून गेला तरीही वीजग्राहक बील भरण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे. वीजबील भरण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपल्ब्ध करून दिले आहेत. या सुविधांचा लाभ घेत वीजग्राहकांना घरबसल्याही बील भरता येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी त्वरीत विज बिलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
*- सूचना -*
१) बातमी लिहून पाहिजे असल्यास कृपया विषयासोबतच रक्कम ही पाठवावी, म्हणजे बातमी वेळेवर तयार करून पाठविता येते.
२) दर शुक्रवारी कॉलिंग आणि व्हाट्सअप दिवसभर सुरू असते.
३) प्रत्येक शनिवार ते गुरुवार अपरिहार्य कारणास्तव दररोज सकाळी १०:३० ते रात्री ०९:०० वाजेपर्यंत माझा मोबाईल बंद असतो.
४) शुक्रवार वगळता बातमी व कार्यालयीन निवेदन लिहून पाहिजे असल्यास कृपया सकाळी १०:०० वाजे पूर्वी किंवा रात्री ०९:०० वाजे नंतरच संपर्क साधावा म्हणजे गैरसोय होणार नाही.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा