Breaking News

दोन उमेदवारांना राजकीय क्षेत्रातील दोन इमानदार व्यक्तिमत्त्वांची आठवण

दोन उमेदवारांना राजकीय क्षेत्रातील दोन इमानदार व्यक्तिमत्त्वांची आठवण

दोन्ही उमेदवार घेणार आता मतदारांची परीक्षा

बीड (एस.एम.न्युज़) - बीड नगर परिषद निवडणुकीसाठी सुरू असलेली रंगत आता चांगलीच रंगात आली आहे. अशा या रंगतदार काळात प्रत्येक पक्षीय आणि अपक्षिय उमेदवार आपापल्या परीने धावपळ करीत आहेत. प्रत्येक उमेदवाराला वाटते की आपणच निवडून यावे आणि पदाधिकारी व्हावे. याकरिता सगळी धावपळ असते. अशा या धावपळीत राजकीय क्षेत्रात ज्यांचे नाव त्यांच्या पश्चात आदराने घेतले जाते, जे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अत्यंत साधे आणि सरळ व्यक्ती होते. ज्यांनी आपल्या हयातीत नेहमी जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या निधनानंतर आज कालच्या मतलबी राजकारणातील महत्वकांक्षी राजकारणी ज्यांची नावे सुद्धा कधी घेत असल्याचे दिसत नाही किंवा ऐकिवात येत नाही. अशा काळात बीड नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने दोन उमेदवारांनी राजकीय क्षेत्रातील दोन साध्या आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वांची आठवण प्रकर्षाने केली आहे.
यातील एक म्हणजे बीड शहर बचाव मंचचे निमंत्रक नितीन जायभाय यांच्या सौभाग्यवती वृषाली जायभाय. ज्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात बारा कलमी मुद्द्यांची हमी यादीच मांडली आहे. याद्वारे त्यांनी आदरणीय मरहूम अतहर बाबर साहब यांच्या स्वप्नातील बीड नगरी निर्माण करण्याची हमी दिली आहे. त्या बीड शहर बचाव मंच व मित्रपक्ष यांची अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी कडून निवडणूक लढवीत आहेत.
तर अतहर बाबर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे शिष्य म्हणून राहिलेले परंतु नियतीने ज्यांना आपल्यातून हिरावून अकाली नेलेले व्यक्तिमत्व म्हणजे मरहूम हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी या अत्यंत साध्या, सरळ आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वाला स्वतः त्यांचे कट्टर समर्थक व शिष्य मानणारे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलियास यांनी त्यांच्या सौभाग्यवती प्रभाग क्रमांक २२(अ) मधून निवडणूक लढविताना आपल्या या राजकीय गुरूला विसरले नाहीत. त्यांनी आपल्या सौभाग्यवती राहत इलियास सय्यद यांच्या निवडणूक प्रचाराकरिता तयार केलेल्या पोस्टरवर दिवंगत हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या छायाचित्राला आवर्जून जागा दिली आहे.
अशा प्रकारे वृषाली नितीन जायभाय आणि राहत इलियास सय्यद या दोन्ही उमेदवारांनी समाज हित हृदयात डोक्यात आणि दृष्टीत ठेवून जीवन व्यतीत करणाऱ्या दोन दिवंगत व्यक्तिमत्त्वाला स्मरून नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून मनस्वी आदरांजली वाहिली आहे. जनतेसाठी चांगल्या राहिलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वाला समोर ठेवून निवडणूकीच्या मैदानात उतरलेले हे दोन्ही उमेदवार आता खऱ्या अर्थाने मतदारांची परीक्षा घेणार आहेत. ३ डिसेंबर रोजी येणाऱ्या निकालात दिसून येईलच की मरहूम अतहर बाबर साहेब आणि मरहूम हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी साहेब यांच्यासारख्या इमानदार दिवंगत व्यक्तींची प्रकर्षाने आठवण ठेवून निवडणूक लढत असलेल्या या दोन्ही उमेदवारांना मतदार निवडून देतात का.

*- सूचना -*

*१) बातमी लिहून पाहिजे असल्यास कृपया विषयासोबतच रक्कम ही पाठवावी, म्हणजे बातमी वेळेवर तयार करून पाठविता येते.*
२) दर शुक्रवारी कॉलिंग आणि व्हाट्सअप दिवसभर सुरू असते.
*३) प्रत्येक शनिवार ते गुरुवार अपरिहार्य कारणास्तव दररोज सकाळी १०:३० ते रात्री ०९:०० वाजेपर्यंत माझा मोबाईल बंद असतो.*
४) शुक्रवार वगळता बातमी व कार्यालयीन निवेदन लिहून पाहिजे असल्यास कृपया सकाळी १०:०० वाजे पूर्वी किंवा रात्री ०९:०० वाजे नंतरच संपर्क साधावा म्हणजे गैरसोय होणार नाही.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत