Breaking News

इमाम हाफ़ीज़ मुहम्मद इलयास यांना मातृशोक आज संध्याकाळी तकिया कब्रस्तानात होणार दफनविधी


इमाम हाफ़ीज़ मुहम्मद इलयास यांना मातृशोक

आज संध्याकाळी तकिया कब्रस्तानात होणार दफनविधी 

बीड (प्रतिनिधी) - शहरातील आसेफ़नगर भागात असलेल्या मस्जिद ए क़ूबा चे सन्माननीय संस्थापक इमाम हाफ़ीज़ मुहम्मद इलयास यांच्या मातोश्रीचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचा दफन विधी आज संध्याकाळी तकिया कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे.

खातून बी दादामियाँ शेख या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणजोत मालवली. मृत्यू समयी त्या ७८ वर्षांच्या होत्या. आज संध्याकाळी नमाज़ ए मग़रीब नंतर त्यांची नमाज़ ए जनाज़ा तकिया मस्जिद येथे पठण करण्यात येणार असून तकिया कब्रस्तानात दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुली, चार मुले, पाच सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. इमाम हाफ़ीज़ मुहम्मद इलयास कुटुंबीयांच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत