Breaking News

अत्तार वेल्फेअर ट्रस्ट अंतर्गत ‘रहनुमा-ए-मिल्लत’ युनिटची स्थापना


अत्तार वेल्फेअर ट्रस्ट अंतर्गत ‘रहनुमा-ए-मिल्लत’ युनिटची स्थापना

उलमा ए दीन चा मोठ्या प्रमाणात समावेश

बीड (एस.एम.न्युज़) - अत्तार वेल्फेअर ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली “रहनुमा-ए-मिल्लत” या नावाने एक नवीन सामाजिक आणि कल्याणकारी युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने आज एक साधा पण प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये समाजातील मान्यवर नागरिक आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले की, रहनुमा-ए-मिल्लतचे प्रमुख उद्दिष्ट समाजामध्ये शिक्षण, आरोग्य, खेळ, महिला व बालकल्याण, वृद्ध व दिव्यांग सेवा, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण अशा महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती करणे असेल.
या प्रसंगी खालील *पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली*
अध्यक्ष मौलाना तारिक अन्वर, उपाध्यक्ष मौलाना मोहसीन इशाअती, सचिव मौलाना मुश्ताक अशरफी, कोषाध्यक्ष/कार्यवाहक मुफ्ती मुख्तार अशरफी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समारंभात वक्त्यांनी सांगितले की, “रहनुमा-ए-मिल्लत समाजसेवेच्या भावनेने कार्य करून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कल्याणकारी सेवा पोहोचवेल आणि समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावेल.”
कार्यक्रमाचा समारोप दुआ पठन करून करण्यात आला.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत